Jamner Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे, अशात सर्वात चर्चेचा विधानसभा जामनेर विधानसभा मतदारसंघात (Jamner Vidhan Sabha Constituency) उमेदवारांना आपली कंबर कसलीय. या मतदार संघात आपल्याला थेट लढत पाहायला मिळणार आहे. भाजपाचे (BJP) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महाजन यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) दिलीप खोडपे (Dilip Khodpe) रिंगणात आहेत. या मतदारसंघातून गिरीश महाजन की दिलीप खोडपे? कोण उधळणार विजयाचा गुलाल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सलग 5 वेळी गिरीश महाजनांना उमेदवारी
महाराष्ट्रातील जामनेर विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यात आणि रावेर लोकसभा मतदारसंघात येतो. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे भाजपच्या तिकिटावर सलग पाचवेळा ही जागा जिंकत असून, या निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. या विधानसभेत ते भाजपला विजय मिळवून देऊ शकतील की जामनेरमधील विजयाचा मुकूट अन्य कोणाच्या हाती जाईल? जामनेर विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार संख्या 2,78,356 असून, येथील एकूण लोकसंख्या 3,49,957 आहे. यावेळी 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.
कोण बाजी मारणार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय भास्कर राव यांचा पराभव केला होता, तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते केशव दिगंबर पाटील यांचा 35,768 मतांनी पराभव केला होता. गिरीश यांना 1,03,498 तर राष्ट्रवादीचे उमेदवार केशव यांना 67,730 मते मिळाली. 2009, 2004, 1999, 1995 मध्येही गिरीश महाजन यांनी भाजपच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती. 1990 आणि 1985 मध्ये काँग्रेसचे नियंत्रण होते, 1980 मध्ये काँग्रेसपासून वेगळे होऊन INC(U) स्थापन झाली, 1978, 1972 मध्ये स्वतंत्र, 1967 आणि 1962 मध्ये काँग्रेसचे नियंत्रण होते. अशाप्रकारे 1962 पासून भाजपने सर्वाधिक पाच वेळा, काँग्रेसने चार वेळा, तर अपक्ष उमेदवारांनी दोनदा ही जागा जिंकली आहे. त्यामुळे आता 2024 ची पाळी आली असून यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
हेही वाचा>
Jalgaon City Vidhan Sabha Constituency: जळगाव शहरात सुरेश भोळे गड राखणार की जयश्री महाजन? कोण उधळणार विजयाचा गुलाल?