Jalna loksabha Election : माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत आहे.  यांच्यासारखा चिंधीचोर नाही, असे म्हणत जालना लोकसभेचे (Jalna loksabha) काँग्रेसचे उमेदवार डॉ.कल्याण काळे (Dr Kalyan Kale) यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांच्यावर टीका केली. कोणीही मला मॅनेज करु शकणार नाही असेही ते म्हणाले. आता कल्याण काळे यांच्या या टीकेला रावसाहेब दानवे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


मला मॅनेज करण्याच्या अफवा, दानवेंच्या पायाखालची वाळू सरकली


दरम्यान, सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्ष प्रचारात आघाडीवर आहे. या काळात राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच जालना लोकसभा मतदारसंघातीलही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या ठिकाणाहून भाजपने पुन्हा एकदा मंत्री रावसाहेब दानवेंना संधी दिलीय. तर काँग्रेसनं डॉ. कल्याण काळेंना मैदानात उतरवलंय. त्यामुळं या लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.  माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत असून यांच्यासारखा चिंधीचोर नाही असं म्हणत डॉ कल्याण काळे यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केलीय. मला मॅनेज करण्याच्या अफवा केल्या जात असल्याचा आरोप करत दानवे यांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याची टीका देखील त्यांनी केलीय.


जालना हा भाजपचा बालेकिल्ला


दरम्यान, जालन्यात भाजपची मोठी ताकद आहे. जालना हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले आहेत. आता सहाव्यांदा ते लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर काँग्रेस नेते कल्याण काळे हे माजी आमदार असून 2009 साली त्यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांचा केवळ 8 हजार मतांनी पराभव झाला होता. नंतर 2014 आणि 2019 सालीही रावसाहेब दानवे जालन्यातून निवडून आले होते. आता पुन्हा एकदा काळे आणि दानवे आमने सामने आले आहेत. या निवडणुकीत वातावरण जरा जास्तच गरम झालं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावुन जालना जिल्ह्यातील वातावरण गरम आहे. त्यामुळं मराठा समाजाच्या मतांचं दान कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Raosaheb Danve Meets Arjun Khotkar : रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांच्या भेटीला; 'दर्शना'वर गळाभेट होताच दोन्ही नेते काय म्हणाले?