जळगाव : जळगाव लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या विजयी झाल्या आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान मागील २० वर्षांपासून जळगावात भाजपचा खासदार आहे, त्यामुळे यंदा येथे काही चमत्कार होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या असून शहरातील भाजप कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून एकच जल्लोष केला आहे.

भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाची (Jalgaon Lok Sabha Constituency) ओळख आहे. या मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ (Smita Wagh) या महायुतीच्या उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करण पवार (karan Pawar) यांना उमेदवारी दिली आहे. मागील 20 वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. यंदा जळगाव लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. जळगाव लोकसभेसाठी यंदा एकूण  57.70 टक्के मतदान झाले आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने मागील निवडणुकीत तिकीट कापलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांनी बंड पुकारले. त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनतर उन्मेष पाटील यांच्यासोबत भाजपमधून बाहेर पडलेले करण पवार यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. उन्मेष पाटील यांनी करण पवार यांना पाठींबा दिला. त्यामुळे जळगावात भाजपची डोकेदुखी चांगलीच वाढली. तसेच जळगाव मतदारसंघात जळगाव, चाळीसगावात भाजपचे आमदार आहेत. तर जळगाव ग्रामीण, एरंडोल व पाचोरा येथे शिवसेना (शिंदे गट) आमदार आहेत. अमळनेरला राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार आहेत. त्यामुळे जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वजन चांगले असून त्यांची भूमिका महत्वाची मानली गेली. आता जळगाव लोकसभेतून भाजपचे कमळ फुलणार की ठाकरेंची मशाल पेटणार? याचे चित्र येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे.  

जळगाव लोकसभा मतदारसंघ 2024 (Jalgaon Lok Sabha Election Result 2024) 

उमेदवाराचे नाव पक्ष विजयी उमेदवार
स्मिता वाघ भाजप विजयी
करण पवार शिवसेना ठाकरे गट  

जळगाव लोकसभा मतदारसंघातील मतदानाची विधानसभानिहाय टक्केवारी

जळगाव लोकसभा मतदारसंघात 2019 च्या तुलनेत मतदान वाढले आहे. यंदा जळगावमध्ये सरासरी 57.70 टक्के मतदान झाले. 19 लाख 94 हजार 046 मतदारांपैकी 11 लाख 50 हजार 536 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 56.11 टक्के इतकी होती. यंदाच्या निवडणुकीत वाढलेल्या मतदानाचा टक्का स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यापैकी कोणासाठी फायदेशीर ठरणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

जळगाव शहर - 52.90 टक्के

जळगाव ग्रामीण - 62.60 टक्के

अमळनेर - 55.94 टक्के

एरंडोल - 61.76 टक्के

चाळीसगाव - 55.01 टक्के

पाचोरा - 59.82 टक्के

जळगाव लोकसभा मदरसंघातील आमदार 

जळगाव शहर - सुरेश पाटील (भाजप)

पाचोरा - किशोर पाटील (शिवसेना शिंदे गट)

चाळीसगाव  - मंगेश चव्हाण (भाजप) 

अमळनेर - अनिल पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट) 

जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील (शिवसेना शिंदे गट)

एरंडोल - चिमणराव पाटील (शिवसेना शिंदे गट)

2019 सालचा जळगाव लोकसभेचा निकाल

2019 च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत जळगावमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या मतदारसंघात 2019 मध्ये 56.11 टक्के मतदान झाले. भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 4,11,617 मतांनी विजय मिळवला, त्यांना एकूण 7,13,874 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे गुलाबराव बाबुराव देवकर यांना 3,02,257 मते मिळाली होती. 

उन्मेष पाटील - 7,13,874 मते (65.6 टक्के) 

गुलाबराव देवकर - ३,०२,२५७ मते  (27.77 टक्के) 

अंजली बाविस्कर - 37,366 मते (3.43 टक्के)

मतदारसंघातील प्रलंबित मुद्द्यांचा प्रचारात जोर

जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक महायुतीकडून मोदींच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहेत यावर मत मागितली गेली. स्थानिक विकासाच्या काही मुद्द्यांना हात लावला गेला मात्र जे मूळ विषय होते ते दूरच राहिल्याचे दिसून आले. तसेच भाजपने खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापली आणि माजी आमदार स्मिता वाघ यांनी भाजपची उमेदवारी जाहीर केली. यानंतर स्मिता वाघ यांच्या बाबत नाराजी दिसून आली होती. माजी खासदार उन्मेश पाटील, ए. टी. पाटील, माजी आमदार सतीष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर या जळगावात मातब्बर नेत्यांनी करण पवार यांच्या विजयासाठी जोर लावला. तर भाजपचे आमदा सुरेश पाटील मंगेश चव्हाण यांच्यासह महायुतीच्या मातब्बर नेत्यांनी स्मिता वाघ यांच्या विजयासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षापासून प्रलंबित पाडळसरे प्रकल्प, रखडलेला औद्योगिक विकास, कापूस उत्पादक शेतकरी जास्त असल्याने कापसाच्या दराचा मुद्दा, गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांचा प्रस्तावित प्रकल्प या मुद्द्यांवर देखील प्रचार करण्यात आला. आता या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.