Indapur Assembly Election 2024 : आजवर तुम्ही हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना संधी दिली आहे. मला एकदा पाच वर्ष संधी देऊन बघा, तुमचा सेवक म्हणून मी काम करेल. शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचाराचा तालुका आपण निर्माण करून दाखवू. इंदापूर (Indapur) तालुक्याचा 1995 सालचा इतिहास पाहा. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे, जेव्हा तिरंगी लढत होते. तेव्हा जो उमेदवार अपक्ष उभा राहतो, तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडून येतो हा इतिहास आहे. लोकांनी सांगितलं आहे आता जर माघारी घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू.


आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे, हे लक्षात ठेवा. मी एकटा आमदार होणार नाही. आज सकाळी बाबीर बुवाला नारळ फोडून नतमस्तक झालो. बाबीर बुवाचा गुलाल घेऊन आलोय. या गुलालाची शप्पथ घेऊन सांगतो, की तुमच्या पाठींब्यामुळे मी आज विधानसभेला अर्ज भरत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी दाखल केलेला अर्ज काढणार नाही. असं म्हणत प्रवीण माने यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघात (Indapur Assembly Election 2024) आता तिरंगी लढत होण्याची शक्यता जवळ जवळ निश्चित झाले आहे. 


भविष्यात आपण साखर कारखाना काढून सर्वांना न्याय देऊ-प्रवीण माने


मी जर उमेदवारी अर्ज माघारी घेतला तर सगळ्यांचा अपमान आहे. तरंगवाडी तलावापर्यंत पाणी आले पाहिजे. इंदापूर तालुक्यातील सर्व शेटफळ कडे पासून ते तरंगवाडी परीची सर्व शेततळी भरली पाहिजेत. निरा डाव्या कालव्याचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे. बावीस गावचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे, तो सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करु. शासनाचा निधी नसतो, नागरिकांनी भरलेल्या करातून तो निधी जमा होत असतो. तो योग्य खर्च झाला पाहिजे. इतर कारखान्याच्या तुलनेते कारखान्यांनी ऊसाला दर दिला पाहिजे, अशी सामान्यांची मागणी आहे. त्यामुळे 15 दिवसाता ऊसाची बिले मिळायला हवी आहेत. भविष्यात आपण साखर कारखाना काढू आणि सर्वांना न्याय देऊ. असा विश्वासही प्रवीण माने यांनी यावेळी बोलून दाखवला.


दारात जाऊ, पाया पडू जनतेने जर आशीर्वाद दिला तर सेवक म्हणून काम करू


 सोनाई 2002 ला काढली. आज घरोघरी गाय आहे. साडेसात हजार कामगार आज काम करतात. आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला पाठींबा द्या, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, सत्तेपासून बाजूला होईल. हे अभिवचन देतो. कोणी दुधाच्या अनुदानाचा विषय काढला तर त्याला उत्तर द्या. कारण अनुदान सरकारचं आहे. दुध संघ चालकाचं नाही. माझे वडील नेहमी म्हणायचे देवाच्या आशीर्वादाने आपलं खूप चांगले आहे. पण बेटा तू माणसं कमाव. जेव्हा संकटं आली तेव्हा हीच जनता धावून आली. सोनाईसाठी हीच जनता रस्त्यावर बसली होती. निवडणुका येतील जातील कोण कोणाची मन दुखवू नका. दारात जाऊ, पाया पडू जनतेने जर आशीर्वाद दिला तर आपण सेवक म्हणून काम करू. जनतेने जर निवडणूक हातात घेतली तर काय होतं हे लोकसभेला पाहिले आहे.


लोकांना मत मागू, पण आपल्या मेरिट वर मागू. टीका करून मिळवलेली दहा मते आपल्याला नको, आपण पाया पडून 20 मते मिळवू. पुढे एक पक्ष साहेबांचा, एक पक्ष अजित दादांचा आहे. त्यांच्याकडे बलाढ्य शक्ती आहे. 40 वर्षाचा अनुभव आहे, कार्यकर्ते आहेत, संघटना आहे, अधिकारी वर्ग आहे. ते ठरवलं तर काहीही करू शकतात. आपल्याकडे समोर बसलेली सामान्य जनता आहे. मात्र आपण संघर्ष करू असेही प्रवीण माने म्हणाले. 


हे ही वाचा