सचिन अहिर आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अहिर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर मातोश्रीबाहेर जमले आहेत. इथे वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदेही पोहोचले. यावेळी शिंदेंना अहिर यांच्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, "कोणाचा प्रवेश होतोय हे मला माहित नाही. सामान्य शिवसैनिकाप्रमाणे इथे आलोय. परंतु पक्षप्रमुख जो आदेश देतील, तो पक्षाच्या हिताचा असेल." तसंच "सचिन अहिर यांना उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार, या प्रश्नावर सुनील शिंदे यांनी "आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेन, असं सूचक विधान केलं..
दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार सचिन अहिर यांचा पराभव केला होता. परंतु आता अहिर यांच्या प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेसाठी आपलं उमेदवारीला धोका निर्माण होण्याची भीती सुनील शिंदे यांच्या मनात असल्याचं म्हटलं जात आहे.