1. तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत चर्चा, भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
 
  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेच्या गळाला, सूत्रांची माहिती तर आमदार वैभव पिचडही भाजपत प्रवेश करण्याची शक्यता
 
  1. शहरी नक्षलवादाचे आरोप असणाऱ्या गौतम नवलखांचा हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध, राज्य सरकारचा मुंबई हायकोर्टात दावा
 
  1. पालघर परिसर भूकंपाने हादरला, रात्री 1च्या सुमारास डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के, 3.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेची माहिती
 
  1. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत मेगाब्लॉक, 15 दिवस डेक्कन आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द, अनेक एक्स्प्रेसचे मार्ग बदलले
 
  1. मुंबईसह उपनगरात पावसाच्या अधूनमधून सरी, तुर्तास लोकलवर परिणाम नाही, मोठ्या प्रतिक्षेनंतर हिंगोलीतही पाऊस
 
  1. देवबंद विद्यापीठात मुस्लिम विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचं काम, माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांचा दावा
 
  1. राज्यातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, एक कोटी कामगारांना फायदा होणार
 
  1. 72 हजार जागांसाठी जाहीर केलेल्या मेगाभरतीला पुन्हा आचारसंहितेमुळं ब्रेक लागण्याची चिन्हं, राज्यभरातले लाखो तरुण हवालदिल
 
  1. मॉब लिंचिंगविरोधात बॉलिवूडमधील दिग्दर्शक, निर्माते, साहित्यिक मैदानात, पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र