मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. जर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादी मुंबईत फक्त नावापुरती उरणार आहे.


मुंबईत राष्ट्रवादीचे सचिन अहिर, नवाब मलिक आणि संजय दीना पाटील हे तीन प्रमुख नेते आहेत. त्यातील संजय दीना पाटील यांचा लोकसभेत पराभव झाला. 2014 विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक आणि सचिन अहिर यांचा पराभव झाला. अशा परिस्थितीत सचिन आहिर यांच्या नावाने राष्ट्रवादी मुंबईत शिल्लक होती.

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर शिवसेनेच्या वाटेवर?


मुंबई महापालिकेने पार्किंगचे दर वाढवले त्या विरोधात सचिन आहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेविरोधात आंदोलन केले होते. सचिन अहिर यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील कामांबाबत नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती. अशा विविध माध्यमातून सचिन अहिर लोकांच्या संपर्कात होते. मात्र आता सचिन अहिर हेच शिवसेनेच्या वाटेवर असल्याने मुंबईत राष्ट्रवादी नावापुरती उरणार आहे.


सचिन अहिर यांच्या जाण्याचा धक्का राष्ट्रवादीला अनपेक्षित बसला. राष्ट्रवादीचे नेते ही बातमी आल्यापासून नॉट रिचेबल झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सचिन अहिर पक्ष सोडणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला आहे. सचिन अहिर पक्ष सोडणार ही अफवा आहे. ज्यांना पक्षाने खास करून शरद पवार साहेबांनी पुत्रव्रत प्रेम दिले ते कधीच गद्दारी करणार नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं जितेंद्र आव्हान यांनी म्हटलं आहे.


संबंधित बातम्या


राष्ट्रवादी विलीनीकरण निव्वळ अफवा, मुद्दाम ही बातमी पसरवण्यात आली : शरद पवार


काँग्रेसबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही राज्यात मोठी खिंडार पडण्याची चिन्हं, अनेक आमदार भाजप-शिवसेनेच्या संपर्कात


राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावण्याची चिन्हं, निवडणूक आयोगाची नोटीस