मोदींची चल (जंगम) संपत्ती 1.41 कोटी रुपयांच्या घरात आहे, तर अचल (स्थावर) संपत्ती 1.10 कोटी रुपये आहे. मोदींवर एकाही रुपयाचं कर्ज नाही. सरकारकडून मिळणारा पगार आणि बँकेतून मिळणारे व्याज हे मोदींच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा जदयू अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंह बादल यांच्यासह एनडीए घटकपक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.
VIDEO | मोदींचा अर्ज भरण्यासाठी एनडीएतल्या घटकपक्षांच्या नेत्यांची उपस्थिती | वाराणसी
गेल्या पाच वर्षातील नरेंद्र मोदींचं वार्षिक उत्पन्न
2013-14 : 9 लाख 69 हजार 711 रुपये
2014-15 : 8 लाख 58 हजार 780 रुपये
2015-16 : 19 लाख 23 हजार 160 रुपये
2016-17 : 14 लाख 59 हजार 750 रुपये
2017-18 : 19 लाख 92 हजार 520 रुपये
चल (जंगम) मालमत्तेचं विवरण :
रोख रक्कम – 38 हजार 750 रुपये
बँकेतील रक्कम - 4 हजार 143 रुपये
बँकेतील ठेवी – 1 कोटी 27 लाख 85 हजार 574 रुपये (एसबीआय)
बाँड – 20 हजार रुपये (एल अँड टी)
एनएससी – 7 लाख 61 हजार 466 रुपये
विमा – 1 लाख 90 हजार 347 रुपये (एलआयसी)
सोने – 45 ग्रॅमच्या सोन्याच्या 4 अंगठ्या (किंमत – 1 लाख 13 हजार 800 रुपये)
85 हजार 145 रुपयांचा टीडीएस मोदींना आयकर विभागाकडून गोळा करायचा आहे. तर पंतप्रधान कार्यालय मोदींना 1 लाख 40 हजार 895 रुपयांचं देणं लागतं.
नरेंद्र मोदींनी आपल्या नावे कोणतीही जमिन किंवा व्यावसायिक इमारत नसल्याचं जाहीर केलं आहे. गांधीनगरमधील एका सदनिकेत त्यांची 25 टक्के मालकी आहे. मोदींच्या मालकीचा 1.10 कोटी रुपये इतका बाजारभाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिक्षण
एसएससी (1967) – एसएससी बोर्ड, गुजरात
बीए (1978) – दिल्ली युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली
एमए (1983) – गुजरात युनिव्हर्सिटी, अहमदाबाद