Kolhapur Nagar Palika Election: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत निवडणुकीमध्ये धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. शिरोळ तालुक्यामध्ये आमदार अशोकराव माने यांना तगडा झटका बसला आहे. अशोकराव माने यांची घराणेशाही मतदाराने अक्षरशः हद्दपार केली आहे. त्यामुळे होम ग्राउंडवर दारुण पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. अशोकराव माने यांची सून सारिका अरविंद माने यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये मुलगा अरविंद अशोकराव माने यांचा सुद्धा दारुण पराभव झाला. इतकेच नव्हे तर त्यांच्या पुतण्याला सुद्धा मतदारांनी घरचा रस्ता दाखवत एक प्रकारे घराणेशाही हद्दपार करून टाकली आहे. त्यामुळे भाजप ताराराणी आघाडीला सपशेल नाकारलं आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रचार केला होता.  त्यामुळे शिरोळ नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सत्ता संपुष्टात आली आहे. 15 नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी झाला आहे. 

Continues below advertisement

शिरोळ नगरपरिषद शिरोळ पंचवार्षिक निवडणूक निकाल 

नगराध्यक्ष = योगिता कांबळे (यादव गट)वॉर्ड नं = 011) पृथ्वीराजसिंह यादव (यादव गट)2) विदुला यादव (यादव गट)वॉर्ड नं = 021) अनिता संकपाळ (यादव गट)2) उल्हास आवळे (यादव गट)वॉर्ड नं = 031) राहुल कोळी (यादव गट)2) शिवानी कांबळे (भैय्या गट)वॉर्ड नं = 041) विजय आरगे (यादव गट)2) श्वेता जाधव (अपक्ष)वॉर्ड नं = 051) अमर शिंदे (भैय्या गट)2) सविता पुजारी (यादव गट)वॉर्ड नं = 061) शाहूल कोळी (अपक्ष)2) रेखा कोरे (यादव गट)वॉर्ड नं = 071) शरद मोरे (बापू) (यादव गट) 2) दिपाली फल्ले (यादव गट)वॉर्ड नं = 081) कल्पना काळे (यादव गट)2) दिपक भाट (यादव गट)वॉर्ड नं = 091) अमरसिंह पाटील (भैय्या) (भैय्या गट)2) अनुराधा गुरव (यादव गट)वॉर्ड नं = 101) ओंकार गावडे (यादव गट)2) सुवर्णा कांबळे (यादव गट)एकूण = यादव गट = 15 नगरसेवक + 1 नगराध्यक्ष = 16भैय्या गट = 3 नगरसेवक अपक्ष = 2 नगरसेवक

दरम्यान, पन्हाळा आणि मलकापूरमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीत जनसुराज्यचे उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे आघाडीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लक्षणीय यश मिळवताना जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड अशा चार ठिकाणी  नगराध्यक्षपदी विजय खेचून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला कागल आणि गडहिंग्लमध्ये अपेक्षित यश मिळालं आहे. मुरगुड नगरपालिकेमध्ये मतदारांनी हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या आघाडीला नाकारत शिवसेना शिंदे गटाला कौल दिला आहे. या ठिकाणी सुहासिनीदेवी पाटील विजयी झाल्या आहेत. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी पिछेहाट झाली असून एकाही जागेवरती विजय मिळालेला नाही. तीच स्थिती शिवसेना ठाकरे गटाची झाली आहे. काँग्रेस सुद्धा अवघ्या दोन ठिकाणी पेठवडगाव आणि शिरोळमध्ये विजय मिळाला आहे. 

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्ह्यातील नगराध्य कौल (एकूण जागा : 13)

  • काँग्रेस : 2 ( पेठवडगाव, शिरोळ) 
  • शिवसेना UBT- 0
  • राष्ट्रवादी SP- 0
  • मनसे - 0 
  • जनसुराज्य - 2 ( पन्हाळा, मलकापूर) 
  • इतर स्थानिक आघाडी
  • भाजप :  3 ( चंदगड, हुपरी, भाजप ) 
  • शिवसेना शिंदे : 4 ( जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड) 
  • राष्ट्रवादी :  2 ( गडहिंग्लज, कागल)

इतर महत्वाच्या बातम्या