Bypolls Result 2023 : सत्ताधारी एनडीएच्या विरोधात देशभरातील सर्व विरोधक एकवटले आहेत. विरोधकांनी एकत्र एक आपल्या आघाडीला इंडिया (I.N.D.I.A) असे नाव दिले होते. देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळाले आहे. सात पैकी चार जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशची जागा भाजपला जिंकण्यात अपयश आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्ष वेगवेगळे लढूनही तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली. उत्तरप्रदेश आणि झारखंडमध्ये मात्र ‘इंडिया’च्या ऐकीचा भाजपला मोठा फटका बसला. केरळमध्ये भाजप स्पर्धक नसल्याने काँग्रेस व ‘माकप’ एकमेकांविरोधात लढले.

देशातील सहा राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये त्रिपुरामधील दोन आणि उत्तराखंडमधील एका जागेवर भाजपला विजय मिळवण्यात यश आले आहे. केरळमधील पुथुप्पली येथे काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये  तृणमूल कांग्रेसने बाजी मारली आहे.  झारखंडमध्ये I.N.D.I.A आघाडीकडून JMM ने विजय मिळवला आहे. उत्तरप्रदेशमधील घोसी येथील जागेवर समाजवादी पार्टीच्या सुधारक सिंह यांनी विजय मिळवला आहे. सहा राज्यातील सात जागांवर 5 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते.  त्यामध्ये पाच जागांवर घोसी (यूपी), बागेश्वर (उत्तराखंड), डुमरी (झारखंड), बॉक्सानगर आणि धनपुर (त्रिपुरा) येथे इंडिया आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती.  

पोटनिवडणुकीचा निकाल 

राज्य विधानसभा जागा  विजय पराभव
उत्तर प्रदेश घोसी SP BJP
पश्चिम बंगाल धुपगुडी TMC BJP
केरळ पुथुपल्ली कांग्रेस CPI (M)
झारखंड डुमरी JMM AJSU
उत्तराखंड बागेश्वर BJP कांग्रेस
त्रिपुरा बॉक्सानगर BJP CPI (M)
धनपुर BJP

CPI (M)

1. उत्तरप्रदेश -

घोसी येथील जागेवर इंडिया आघाडीकडून समाजवादी पार्टी (SP)च्या सुधाकर सिंह  यांनी विजय मिळवला.  सुधाकर यांनी भाजपच्या दारा सिंह यांचा 42672 मतांनी पराभव केला.  

2. झारखंड - 

डुमरी मतदारसंघात I.N.D.I.A आघाडीकडून झारखंड मुक्ति मोर्चा (JMM) च्या बेबी देवी यांनी बाजी मारली आहे. त्यांनी एनडीएच्या उमेदवार यशोदा देवी यांचा  13000 हजार मतांनी पराभव केला.  

3. उत्तराखंड - 

बागेश्वर मतदार संघातून भाजपच्या पार्वती दास यांनी विजय मिळवला. पार्वती दास यांनी काँग्रेसच्या बसंत कुमार यांचा पराभव केला. चंदन राम दास यांच्या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणूक झाली. 
 
4. त्रिपुरा - 

बॉक्सानगर आणि धनपूर मतदार संघात भाजपने विजय मिळवला.  धनपूरमधून भाजपच्या बिंदु देबनाथ यांनी CPI (M) च्या कौशिक चंदा यांचा 18,871 मतांनी पराभव केला. तर बॉक्सानगर येथे तफज्जल हुसैन यांनी CPI (M) च्या मिजान हुसैन यांचा 30,237 मतांनी पराभव केला. 

5. केरळ - 

पुथुप्पलीमधून काँग्रेसच्या चांडी ऑमान यांनी 37,000 पेक्षा जास्त मतांनी विजय नोंदवला.  ओमान चांडी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती.  भाजपकडून लिजिन लाल निवडणुकीच्या रिंगणात होते.

6. पश्चिम बंगाल -

 धुपगुडी मतदार संघात तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. त्यांचा 4000  मतांनी विजय झाला. भाजपकडून येथे टक्कर देण्यात आली.