दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज मंगळवारी ऑटो चालकांसाठी पहिली मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत ऑटो चालकांसाठी अपघात विमा दिला जाईल. ऑटो चालकांच्या मुलांच्या कोचिंगचा खर्चही दिल्ली सरकार उचलणार आहे. ऑटो चालकाच्या मुलीच्या लग्नासाठीही एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. एवढेच नाही तर वर्षातून दोनदा गणवेशासाठीचे पैसेही ऑटो चालकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
ऑटो चालकांसाठी 5 मोठ्या घोषणा
1- दिल्लीतील ऑटो चालकांसाठी विमा असेल.
2- ऑटो चालकांना 10 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा असेल.
3- ऑटोचालकाच्या मुलीच्या लग्नात 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
4- ऑटो चालकांच्या गणवेशासाठी 2500 रुपये वर्षातून दोनदा खात्यात जमा होतील.
5- ऑटो चालकांच्या मुलांच्या कोचिंगचा खर्च सरकार उचलणार आहे.
'आप'ने दिली पहिली हमी
अरविंद केजरीवाल यांनी ऑटो चालकांसाठी केलेल्या घोषणेची माहिती आम आदमी पार्टीने फेसबुकवर शेअर केली आहे. केजरीवालांची पहिली हमी, आम आदमी पार्टीने दिल्लीत पुन्हा एकदा सरकार आल्यास ऑटो बंधवांसाठी अरविंद केजरीवाल यांनी 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत. ऑटो चालकांना 10 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जाईल. यामध्ये 5 लाख रुपयांच्या अपघात विम्याचा समावेश असेल. ऑटो चालकांच्या मुलीच्या लग्नासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीतील ऑटो चालकांबाबत त्यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोणत्याही ऑटोचालकाच्या मुलीचे लग्न झाल्यास सरकार एक लाख रुपये देईल, अशी घोषणा त्यांनी केली. प्रत्येक वाहन मालकाला 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाईल.
अरविंद केजरीवाल म्हणाले, "माझे ऑटो चालकांसोबत खूप जुने नाते आहे. मला आठवते 2013 मध्ये जेव्हा माझा नवा पक्ष स्थापन झाला, तेव्हा दिल्लीत काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी दिल्लीत ऑटो चालकांची बदनामी केली जात होती. मी त्यांच्या समर्थनात होतो. ऑटो चालकांची मी एक बैठक घेतली. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अनेक प्रकारची कामे केली. काल घरी ऑटो चालक बांधवांची भेट झाली. त्यांनी मला त्याच्या घरी जेवायला बोलावले. त्यांनी खूप छान जेवण बनवलं. मी आता ऑटो चालकांचं मीठ खाल्ले आहे, असंही केजरीवाल पुढे म्हणालेत."