BMC Election: राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचे ग्रहण आहे. अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने मोठी नाराजी निर्माण झाली आहे. दुसरीकडे आयारामांना मात्र रेड कार्पेट अंथरून पायघड्या सुरू असल्याने नाराजीचा मोठा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चांदा ते बांदा ही नाराजी सर्वत्र दिसून येत आहे. गुंडाना सुद्धा न सोडलेल्या भाजपने सरसकट आयारामांना संधी दिल्याने पक्षातील निष्ठावंताना प्रत्येक ठिकाणी फटका बसला आहे. मुंबईत चेंबूरमध्येही आता भाजपमध्ये मोठी बंडखोरी समोर आली आहे. या ठिकाणी सुद्धा आयात केलेल्या उमेदवारालाच भाजपने प्राधान्य दिल्याने जुन्या कार्यकर्त्यांनी  बंडाचं निशाण फडकावलं आहे. 

Continues below advertisement

दोन दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या उमेदवाराला भाजपची उमेदवारी

चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 155 मधील भाजपच्या तीन इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावत पक्षाला इशारा दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहेत. मुंबई भाजपकडून दोन दिवसांपूर्वी पक्षात दाखल झालेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने मोठी नाराजी पसरली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपत आलेल्या माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याने भाजपकडील इच्छुक नगरसेवक माजी नगरसेवक जयश्री खरात, हर्ष साळवे आणि शशिकला कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपसमोर तगडं आव्हान निर्माण केलं आहे. त्यामुळे आता ही लढत बहुरंगी लढत होणार आहे.

राहुल शेवाळेंच्या पत्नीची माघार

दुसरीकडे शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून राहुल शेवाळे यांच्या पत्नीने माघार घेतली आहे. वॉर्ड क्रमांक 142 मधून राहुल शेवाळे यांच्याकडून पत्नीसाठी चाचपणी सुरू होती. मात्र, कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी निवडणुकीतून माघार घेतल्याचं कामिनी शेवाळे यांनी म्हटलं आहे. या वॉर्डमधून आता नव्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या