Divyanka Tripathi struggle: स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही. लखलखत्या ताऱ्याप्रमाणे चमकण्यासाठी सिनेसृष्टीत बरेच जण स्वत:ला झिजवतात. या इंडस्ट्रीत असे बरेच जण आहेत, ज्यांनी शुन्यातून आपले विश्व निर्माण केले आहे. संघर्षातून मायानगरीत स्वत:चं एक अस्तित्व निर्माण केलं आहे. अशाच प्रकारे एका टिव्ही अभिनेत्रीने देखील स्ट्रगल करत यशाचे शिखर गाठले आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही या अभिनेत्रीने अभिनयाच्या जोरावर स्वत:चं विश्व निर्माण केले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी नसून प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आहे. होय, या अभिनेत्रीने टिव्ही विश्वात एक वेगळीच छाप सोडली आहे. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. परंतु, एकेकाळी तिची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. पण या परिस्थितीवर मात देत तिने लोकप्रियता मिळवली.
दिव्यांका त्रिपाठी. हे नाव तसं टिव्ही विश्वात गाजलेलं नाव. पण तिचा स्ट्रगल काही सोपा नव्हता. एकेकाळी तिच्यावर भंगार विकून उदरनिर्वाह करण्याची वेळ आली होती. तिच्या सुरूवातीच्या परिस्थितीबाबत तिने नुकतेच एका मुलाखतीतून खुलासा केला होता. आर्थिक अडचणींबद्दल बोलताना दिव्यांका म्हणाली, " खरंतर एक कार्यक्रम संपल्यानंतर नव्या कामासाठी अधिक संघर्ष करावा लागतो. अनेकदा असंही होतं की, तुमच्याकडे पैसे नसतात. अशावेळी घरचा खर्च भागावा लागतो. बिल, ईएमआय, या जबाबदाऱ्याही असतात. अशावेळी उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याला मिळेल ते काम करतो", असं दिव्यांका म्हणाली.
उदरनिर्वाहासाठी भंगार विकले
"तुम्हाला तुमचे प्रयत्न सुरू ठेवावे लागतात. मी उदरनिर्वाहासाठी भंगार एकत्र करायची. टुथपेस्टचे डबे गोळा करायची. यातून मी पैसे जमा करायची. मिळाले पैसे मी बचत करायची. पैसे जमवण्यासाठी मी जमा झालेला भंगार विकायची. कठीण काळात पैसे कमावण्यासाठी बरेच मार्ग शोधावे लागतात", असं दिव्यांका म्हणाली. दिव्यांकाला कमी कालावधीत लोकप्रिय मिळाली. तिला टिव्ही शोमधून प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.
आज दिव्यांकाकडे पैशांची कमतरता नाही. एका शोच्या प्रत्येक एपिसोड़साठी ती 2 लाख रूपये घेत असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 40-50 कोटी असल्याची माहिती आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर एवढं साम्राज्य उभं केलं आहे. दिव्यांकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रीय असते. चाहत्यांसोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. दरम्यान, दिव्यांका तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते.