Himachal Pradesh ABP C voter Exit Poll Result Live : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान पार पडलं होतं. हिमाचलमधील सर्व 68 जागांवर 12 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. आता राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याआधी C VOTER ने ABP न्यूजसाठी एक सर्वेक्षण करत एक्झिट पोल केला आहे. या सर्वेक्षणाचा सॅम्पल साईज 30 हजार आहे. म्हणजे 68 विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मतदारांचा कौल यामध्ये आहे.
या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे. गेल्या वेळी हिमाचल प्रदेशमध्ये 44 जागा घेत भाजपनं एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. यंदा भाजपला काही जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. 33 ते 41 जागा यंदा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. असं असलं तरी सत्तेत भाजपच असेल असं चित्र या सर्व्हेतून दिसतंय. तर काँग्रेसच्या मात्र जागा यंदा वाढताना दिसत आहेत. काँग्रेसला गेल्या वेळी 21 जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेस 24 ते 32 पर्यंत जागा जिंकू शकतो असा सर्व्हेचा अंदाज आहे. आपला मात्र इथे शून्य जागा मिळतील असं सर्व्हेतून दिसतंय.
एक्झिट पोल – हिमाचल प्रदेश 2022
कोणत्या पक्षाला किती जागा?
पक्ष 2017 निकाल एक्झिट पोल
भाजप – 44 33-41
काँग्रेस – 21 24-32
आप – 00 00
इतर - 00 04
हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानादरम्यान 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. हिमाचलमध्ये राज्यात दर पाच वर्षांनी सरकार बदलत राहतं. हिमाचल विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकून बहुमताने सरकार स्थापन केले. काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. गुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत आहे.
अशा पद्धतीनं केला आहे एक्झिट पोलसाठी सर्व्हे
हिमाचलमधील सर्व 68 जागांवर 12 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याआधी C VOTER ने ABP माझासाठी एक सर्वेक्षण करत एक्झिट पोल केला आहे. या सर्वेक्षणात हिमाचल प्रदेशात सर्व 68 जागांवर 18 वर्षांवरील 30 हजार लोकांची मतं घेण्यात आली आहेत. या सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.
एक्झिट पोल पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक कराल...
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
ही बातमी देखील वाचा