Himachal Pradesh Election 2022 : भाजपनं हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीसाठी (Himachal Pradesh Election 2022) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत भाजपनं 62 उमेदवारांची नावं (list of 62 candidates) जाहीर केली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर (jairam thakur) हे सिराज मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. या 62 जणांमध्ये भाजपन पाच जागांवर महिला उमेदवारांनी संधी दिली आहे. दरम्यान, सिराज मतदासंघातील लढत ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण काँग्रेसने याआधीच या जागेवर चेतराम ठाकूर यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्यानंतर आता भाजपनेही मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली आहे.


भाजपने 62 उमेदवारांच्या पहिल्या यादीत पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. या पाच नावांपैकी चंबा येथून धक्कादायक नाव समोर आले आहे. भाजपने चंबामधून इंदर कपूर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय विद्यमान मंत्री सरवीन चौधरी यांना शाहपूरमधून तिकीट दिले आहे. तसेच इंदूरमधून रीता धीमान, पच्छाडमधून रीना कश्यप, रोहडूमधून शशी बाला यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


11 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले, नवीन चेहऱ्यांना  दिली संधी


भाजपने ज्या 62 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यापैकी 11 जागा अशा आहेत, जिथे विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. या जागांवर नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मंगळवारी (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत भाजपच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. त्यानंतर भाजप हिमाचल प्रदेश निवडणुकीची यादी जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर 62 उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम रमेश हे आज निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 


कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम


केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) हिमचाल विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election) घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे तर 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 8 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये कुणाचं सरकार होणार हे स्पष्ट होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Himachal Pradesh Election 2022 Date : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा; असा आहे निवडणूक कार्यक्रम