चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा यश मिळताना दिसतंय. एक्झिट पोलचे अंदाज या निवडणुकीत देखील चुकीचे ठरल्याचं समोर येतंय. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार 47 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस 38 जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष 1, भारतीय लोकदल 1 आणि अपक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत. ज्या 3 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत, त्यामध्ये हिसार विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या जागेवरुन सावित्री जिंदाल आघाडीवर आहेत. शेवटच्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून जिंदाल यांच्या विजयाची औपचारिकता बाकी आहे. सावित्री जिंदाल यांनी भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवली होती.


भाजपनं उमेदवारी नाकारली, अपक्ष लढल्या


सावित्री जिंदाल यांना 12 व्या फेरीपर्यंत 49231 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या राम निवास रारा यांना 30290 मतं मिळाली तर, भाजपचे कमल गुप्ता यांना 17385 मतं मिळाली. भाजपनं ज्या कमल गुप्ता यांच्यासाठी सावित्री जिंदाल यांना उमेदवारी नाकारण्यात आली ते तिसऱ्या स्थानावर आहेत.  12 व्या फेरीपर्यंत सावित्री जिंदाल 18941 मतांनी आघाडीवर आहेत. 


सावित्री जिंदाल या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला आहेत. त्यांची नेटवर्थ 4280 कोटी रुपये आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्या भाजपमध्ये गेल्या होत्या. मात्र, त्यांना भाजपनं तिकीट न दिल्यानं नाराज होत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. 


सावित्री जिंदाल या हरियाणामधील भाजपचे खासदार नवीन जिंदाल यांच्या आई आहेत. भाजपनं सावित्री  जिंदाल यांच्याऐवजी कमल गुप्ता यांना उमेदवारी दिली होती. 


सावित्री जिंदाल या सध्या सावित्री जिंदाल अँड फॅमिली ग्रुपच्या प्रमुख आहेत. फोर्ब्स बिलेनियर इंडियन लिस्टमध्ये त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. जागतिक पातळीवरील यादीचा विचार केला असता त्या 37 व्या स्थानावर आहेत. भारतातील श्रीमंतांच्या यादीत त्या तिसऱ्या स्थानावर आहेत. श्रीमंत महिलांचा विचार केला असता त्या पहिल्या स्थानावर आहेत.


भाजपची हरियाणात पुन्हा सत्ता 


हरियाणा राज्यातील जनतेनं पुन्हा एकदा भाजपला पसंती दिल्याचं चित्र आहे. भाजप आता सलग तिसऱ्यांदा हरियाणात सत्ता स्थापन करणार आहे. एक्झिट पोलचे अंदाज हरियाणामध्ये यावेळी देखील चुकले असल्याचं स्पष्ट झालं आहे. हरियाणा राज्यात काँग्रेसच्या बाजूनं वातावरण असताना देखील त्यांना यश मिळवता आलं नसल्याचं चित्र आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये या वेळी वाढ झाली आहे. 


इतर बातम्या :


Vinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट


हसन मुश्रीफांनी खेकड्यासारखं पाय ओढले, त्यांच्याविरोधात उभा राहणार, वीरेंद्र मंडलिकांनी शड्डू ठोकला, महायुतीत राडा