Guhagar Vidhan Sabha Constituency Election 2024 : गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजेश बेंडल (Rajesh Bendal) यांना उमेदवारी देण्यात आली होती, पण गुहागरमध्ये (Guhagar Vidhan Sabha Election 2024 Result) त्यांचा दारुण पराभव झाला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यंदाही बहुमताने निवडून आले आहेत. आताही गुहागर मतदारसंघाचे आमदार हे भास्कर जाधव आहेत.


2019 मध्येही भास्कर जाधव विजयी


गुहागर विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 2 लाख 39 हजार 663 मतदारांपैकी 59.6 टक्के म्हणजे 1 लाख 40 हजार 647 मतादारांनी मतदान केलं. यापैकी भास्कर जाधव यांना 56 टक्के म्हणजे 78 हजार 748 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहदेव बेटकर यांना 52 हजार 297 म्हणजे एकूण झालेल्या मतदानापैकी 37.2 टक्के मिळाली. पण, सध्या बेटकर शिंदेंच्या शिवसेनेत आहेत.  


रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती  


1. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ 


उदय सामंत (शिवसेना)
बाळ माने (उबाठा)


विजयी : उदय सामंत (शिवसेना शिंदे गट)


2. राजापूर विधानसभा मतदारसंघ 


राजन साळवी (उबाठा)
किरण सामंत (शिवसेना)
अविनाश लाड (अपक्ष)


विजयी : किरण सामंत (शिवसेना शिंदे गट)


3. गुहागर विधानसभा मतदारसंघ


भास्कर जाधव (उबाठा)
राजेश बेंडल (शिंदे गट)
प्रमोद गांधी (मनसे)


विजयी : भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट)


4. दापोली विधानसभा मतदारसंघ


योगेश कदम (शिंदे गट)
संजय कदम (उध्दव गट)
संतोष अबगुले (मनसे)


विजयी : योगेश कदम (शिवसेना शिंदे गट)


5. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ


शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)
प्रशांत यादव (शरद पवार गट)


विजयी : शेखर निकम (अजित पवार गट राष्ट्रवादी)


हेही वाचा:


Rajapur Vidhan Sabha 2024 Results : राजापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे किरण सामंत विजयी, ठाकरे गट पराभूत