कोल्हापूर: निवडणुकीच्या रिंगणात असलेले कोणीही पसंत नसल्यास मतदारांना 'नोटा' म्हणजे वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसल्याचा पर्याय देण्यात आला आहे. पण जर या नोटालाच सर्वाधिक मतं मिळाली तर? असाच काहीसा प्रकार कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात (Kolhapur Gram Panchayat Election Results) घडला आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार दोन नंबरची मतं घेण्याऱ्या उमेदवाराला विजयी घोषित केलं. 


ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नोटाला सर्वाधिक मतदान मिळून देखील दोन नंबर मतदान मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले, यावर आता अनेकांनी आक्षेप घेतला.  


चंदगड तालुक्यातील कागणी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नोटाला सर्वाधिक मतदान मिळालं. त्यामुळे मग दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार शितल अशोक कोरे यांना विजयी घोषित करण्यात आलं. 


Kolhapur Gram Panchayat Election Results: कांगणी येथील वार्ड क्रमांक 2 ग्रामपंचायत येथे नोटाला बहुमत 


कोरे शितल अशोक :279
मंगल अमृता पाटील :46
नोटा:285


या संदर्भात अॅड संतोष मळवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना जाब विचारला असता त्यांनी सांगितले की नोटा बटनचा विचार ग्रामपंचायत निवडणुकीत करता येणार नाही. यावर मळविकर आणि ग्रामस्थांनी सदरचे नोटा बटन मग मतदान पत्रिकेवर ठेवलेच का असा सवाल केला. जर फेरनिवडणूक नाही झाली तर तहसिलदार कार्यालयाला टाळे ठोकू असा इशाराही त्यांनी दिला आहे. नोटा हे महानगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी ग्राह्य धरलं जातं, मग ग्रामपंचायत निवडणुकीसाठी त्याचा विचार का केला जात नाही असा सवालही ग्रामस्थांनी विचारला.  


Kolhapur Gram Panchayat Election Results: काय आहे नियम? 


निवडणुकीमध्ये जर कोणत्याही उमेदवारापेक्षा 'नोटा'ला (NOTA- None Of The Above) सर्वाधिक मतं मिळाली तर त्या ठिकाणी फेरनिवडणूक घेण्याची तरतूद आहे. जर फेरनिवडणुकीमध्येही नोटालाच सर्वाधिक पसंती मिळाली तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजयी घोषित केलं जातं.  


पुण्यातही नोटाच वरचढ


पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत म्हाकोशी गावात विजयी उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मतं पडली. त्यामुळं आख्ख गाव संभ्रमावस्थेत पडलं होतं. आता हे सदस्यपद रिकामं राहणार की पुन्हा निवडणूक होणार? असे तर्कवितर्क लढवले जात असतानाच निवडणूक आयोगाच्या एका नियमानुसार दोन नंबरची मतं मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आलं. 


ही बातमी वाचा :