Ajit pawar On koyta Gang Pune : पुणे आणि आजूबाजूच्या गावात कोयता गॅंगने धुमाकुळ घातला आहे. या कोयता गॅंगची दहशत थांबवा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar On koyta Gang Pune) यांनी केली आहे. त्यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कोयता गॅंगमुळे अनेक सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. मागील अनेक दिवसांपासून नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे त्यांचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुणे आणि आजूबाजूच्या काही गावांमध्ये कोयता गॅंगने दहशत निर्माण केली आहे. या गॅंगमधील काही मुलं अगदी तरुण आहे. ही मुलं परिसरातील अनेक रस्त्यावर सक्रिय आहेत. मुलं सोशल मीडियावर गुन्हेगारी बघतात आणि त्याप्रमाणे वागत असल्याचं समोर आलं आहे. हॉटेल्सची बिलं देत नाही, गाड्यांच्या काचा फोडतात, महिलांनादेखील दमदाटी करतात. त्यांच्या कृत्यांमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत थांबायला हवा. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ आदेश द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
कोयत्या गॅंग कोणत्या पक्षाशी संबंधित नाही आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना आदेश देत या गॅंगचा निकाल लवकरात लवकर लावणं गरजेचं आहे. या गॅंगवर मोक्का लावा किंवा तडीपार करा, मात्र दहशत थांबवण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करण्याची गरज असल्याचंदेखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Ajit pawar On koyta Gang Pune: नागरिकांच्या वारंवार तक्रारी देऊनही कारवाई नाही
या कोयत्या गॅंगमुळे हडपसर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक व्यापारी आणि लहान भाजी विक्रेते या गॅंंगमुळे धास्तावले आहेत. या संदर्भात अनेकदा व्यापाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसही त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असतात, मात्र त्यांना पोलिसांचीही भीती उरली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या गॅंंगची दहशत वाढत आहे. व्यापारी म्हणतात, या कोयता गॅंंगमुळे आम्हाला त्रास होत आहे, शिवाय त्यांच्या दहशतीमुळे लहान व्यापाऱ्यांवर आणि ग्राहकांवरदेखील मोठा परिणाम होत आहे. अनेक लोक या गँगमुळं धास्तावले आहे. लहान मुलांनाही या गँगकडून धमक्या येत आहेत. यामुळे मुलांसह पालकही धास्तावले आहे. त्यामुळे या गॅंंगचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून मागणी केली जात आहे.
koyta Gang Pune CCTV: सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल
परिसरातील प्रत्येक नागरिकाला या गॅंंगमुळे घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. पोलिसांनाही तक्रारी देऊन कोणताही बंदोबस्त केला जात नसल्याचं चित्र आहे. पोलीस या प्रकरणाचं गांभीर्य कधी ओळखणार?, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या गॅंंगचे सीसीटीव्ही फुटेजदेखील व्हायरल झाले आहे.