मुंबई : विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. राज्यातील सर्वच पक्ष पूर्ण तकादीने आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. प्रमुख नेतेमंडळी तर एका दिवसात चार-चार सभा घेत आहेत. मतदानाला कमी कालावधी शिल्लक राहिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र कसा पिंजून काढता येईल? यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नरत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेदेखील यात मागे नाहीयेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सभा होत आहेत. दरम्यान, या पक्षाकडून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली जात असताना या पक्षाला भिंवडीमध्ये मोठा झटका बसला आहे. भिवंडीतील भिवंडी ठाकरे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख व माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी ठाकरे यांची साथ सोडती एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाळी म्हात्रे याचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
म्हात्रे निवडणुकीत भिवंडी पूर्व या जागेसाठी होते इच्छूक
म्हात्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्याच्यावर शिंदे यांनी उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. म्हात्रे या विधानसभा निवडणुकीत भिवंडी पूर्व या जागेसाठी इच्छूक होते. परंतु महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत ही जागा समाजवादी पक्षाला सुटली. महाविकास आघाडीकडून या जागेसाठी समाजवादीचे रईस शेख हे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच म्हात्रे हे नाराज होते.
अनेक कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
तिकीट न मिळाल्याने म्हात्रे यांनी अनेकवेळा आपली नाराजी बोलून दाखवली होती. एका सभेत बोलताना म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधान केले होते. त्यानंतर त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेन बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता 8 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दरम्यान, आता मतदानासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. प्रमुख नेत्यांचे आगामी दिवसांतील सभांचे नियोजन ठरले आहे. त्यामुळे भविष्यात आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा :
भिकार संपादक, गांxx समजू नका, राज ठाकरेंचा हल्ला, आता संजय राऊतांचं जशास तसं उत्तर!