जाधव पती-पत्नी 1980 पासून सक्रिय राजकारणात आहेत. 1995 साली माणिक जाधवांनी जनता दलाच्या तिकीटांवर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा पराभव केला. यावेळी निलंगेकर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.
साखर कारखान्यातल्या कामगारांच्या प्रश्नावर आंदोलन करत माणिकराव आणि त्यांच्या पत्नी कांता जाधव सक्रिय राजकारणात आले. दोघेही पदवीधर आहे. मात्र प्रस्थापित राजकारण्यांनी जाधव पती-पत्नीवर फौजदारी गुन्ह्यांचा पाऊस पाडला. तुरुंगात पोलिसांनी अनेकदा मारल्याचं माणिक जाधव सांगतात.
देशातली प्रत्येक निवडणूक साम..दाम...दंड..भेद या तत्त्वावर लढली जाते. त्यात जो जिंकेल तो आमदार, खासदार. तर नानासाहेब, माणिक जाधव यांच्यासारखे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर.
VIDEO | राजकारणात कसं संपवलं जातं याचं ज्वलंत उदाहरण