वाराणसी :   रायबरेली लोकसभा क्षेत्रातून भारतीय जनता पक्षाकडून सोनिया  गांधी यांच्या विरोधात 2014 ची लोकसभा निवडणूक लढविणारे ज्येष्ठ वकील यावेळी मात्र पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचार करताना दिसत आहेत.


गेल्या वेळी सोनिया गांधी यांच्या विरोधात भाजप उमेदवार असलेले ज्येष्ठ वकील अजय अग्रवाल यंदा मात्र वाराणसीमध्ये मोदींच्या विरोधात प्रचार करतआहेत.  अजय अग्रवाल यांनी राजीव गांधी यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून देखील जोरदार टीका केली आहे.

बोफोर्स प्रकरणी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात कुठलाही आरोप सिद्ध झालेला नाही. त्यांना या प्रकरणात क्लीनचिट मिळालेली आहे, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

अग्रवाल यांनी दावा केला आहे की, त्यांनी 14 वर्ष हिंदुजा बंधूंच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिकाकर्त्यांच्या रूपात बोफोर्स प्रकरणी प्रतिनिधित्वकेले आहे. आणि या प्रकरणाची आपल्याला इत्यंभूत माहिती आहे, असेही ते म्हणाले.

अजय अग्रवाल हे सध्या पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात प्रचारासाठी वाराणसीत तळ ठोकून आहेत. मोदी निवडणुकीत फायद्यासाठी पाकिस्तानविरोधात युद्ध भडकवत असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे.