अनुराग कश्यप अनेक मुद्द्यावर बिनधास्तपणे मत मांडतो. त्याच चित्रपटाचा चाहता वर्गही वेगळा आहे. राजकारणावरही तो जाहीर मत मांडतो आणि तो कायम ट्रोलही होतो. पण यावेळी ट्रोलर्सनी हद्द पार करुन त्याच्या मुलीवर निशाणा साधला आहे आणि अतिशय आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. अनुरागने त्या ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करुन नरेंद्र मोदी यांना विचारलं आहे की, या लोकांशी कसं वागावं?
अनुराग कश्यप बऱ्याचदा मोदी सरकारच्या विरोधात बोलतो. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर एका मोदी समर्थकाने अनुरागच्या मुलीबाबत घृणास्पद कमेंट केली. अनुरागने त्याचा स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिलं आहे की, "नरेंद्र मोदी सर, विजयासाठी शुभेच्छा. सर, आम्हालाही सांगा की, तुमच्या त्या समर्थकांशी कसं वागावं, जे या विजयाचा जल्लोष माझ्या मुलीला धमकी देऊन करत आहे, कारण मी तुमचा विरोधी आहे?"
अनुराग कश्यप सध्या 'सांड की आंख' हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.