लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाने 70 लाख रुपयांची मर्यादा ठरवून दिली आहे. यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवारावर निवडणूक आयोगाची नजर आहे. याचं उल्लंघन केल्यास उमेदवाराला कारवाईला सामोरं जावं लागेल.
VIDEO | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभाग सज्ज | मुंबई | एबीपी माझा
सध्या निवडणुकीसोबतच लग्नसराईचीही धामधूम आहे. निवडणुकीतील खर्च लपवण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. सांगलीतील वाळवामध्ये 31 मार्च रोजी असलेल्या विवाहाची पत्रिका सध्या व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर लग्नाच्या निमंत्रणासोबतच एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला मतदान करण्याची टीपही लिहिली आहे.
लग्नपत्रिकेचा वापर करुन उमेदवारासाठी मत मागण्याचा प्रकार इतर ठिकाणीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग लग्नपत्रिकाही तपासणार आहे. यासाठी उमेदवाराच्या खर्चाची तीन वेळा तपासणी केली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.