Eknath Shinde On Raj Thackeray मुंबई: महायुतीत मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत नाही, आमची शर्यत विकासाची..., असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एबीपी माझाच्या EXCLUSIVE मुलाखतीत केला आहे. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी नेमका फॉर्म्युला ठरलेला नसल्याचंही स्पष्टीकरण एकनाथ शिंदेंनी दिलं आहे. माहीमवरुन मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत थोडा दुरावा निर्माण झाला. काही बाबींवर वेळेवर चर्चा व्हायला हवी होती, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये माहीम विधानसभा मतदारसंघावरुन तुमचे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे संबंध गडबडलेत का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आमच्यात कम्युनिकेशन गॅप नक्की झालेला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. माहीमवरुन राज ठाकरेंसोबत थोडा दुरावा निर्माण झाला. तसेच शेवटी राज ठाकरे देखील एका पक्षाचे प्रमुख आहेत. मी देखील मुख्यमंत्री आणि एका पक्षाचा प्रमुख आहे. कार्यकर्ता जपायचा असतो, पक्ष चालवायचा असतो, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
राज ठाकरे आमचे चांगले मित्र- एकनाथ शिंदे
काही गोष्टींची वेळेवर चर्चा होणे आवश्यक असते. काही बाबींवर वेळेवर चर्चा व्हायला हवी होती, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. आमच्यात कधीही वाद होऊ नये अशी माझी इच्छा असते आणि हीच त्यांची देखील असते. राज ठाकरेंसोबत आमच्यात मतभेद किंवा विसंवाद नाही. पण राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी स्पष्ट केलं.
हलक्यात घेणे म्हणजे नक्की काय?, एकनाथ शिंदे म्हणाले...
एबीपी माझाच्या या मुलाखतीमध्ये तुमचं एक वाक्य चांगलंच गाजतंय ते म्हणजे मला हलक्यात घेतलं आणि मी सरकार उलटवलं, हलक्यात घेणे म्हणजे नक्की काय?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्यांना सांगत होतो. आपण शिवसेना भाजप म्हणून लढलो आहे. आपण मोदीजी बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून प्रचार केला आहे आणि लोकांनी त्यामुळे आपल्याला मतदान केलं आहे. पुन्हा आपण शिवसेना भाजप असं सरकार आणूया पुन्हा सगळं झालं गेलेले विसरून जाऊयात, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
राज ठाकरेंसबोतचे संबंध बिघडले? एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले, Video:
संबंधित बातमी:
Uddhav Thackeray: भाषण संपताच स्टेज खचला; उद्धव ठाकरे कडेकडेनं उतरले, ठाण्यात नेमकं काय घडलं?, Video