पुणे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) बारामती हा मतदारसंघ (Baramati Constituency) फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या जागेवर काका-पुतण्या अशी थेट लढत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून युगेंद्र पवार हे एकमेकांविरोधात उभे आहेत. अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी या जागेवरचा विजय प्रतिष्ठेचा बनला आहे. असे असतानाच आता 18 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शरद पवार यांच्या प्रचारातील शेवटच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शरद पवार या विधानसभा निवडणुकीत एखाद्या झंझावाताप्रमाणे महाराष्ट्रभर फिरत आहेत. एका दिवशी ते तीन ते चार सभा घेत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंतचे त्यांचे वेळापत्रक ठरलेले आहे. याच वेळापत्रकानुसार शरद पवार यांची विधानसभा निवडणुकीसाठीची शेवटची सभा 18 नोव्हेंबर रोजी बारामती येथे होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. 

Continues below advertisement

शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार आहे? 

बारामती हा मतदारसंघ शरद पवार यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. येतील मतदार नेहमीच शरद पवार यांना मानाचं स्थान देत आला आहे. तर दुसरीकडे मतदारसंघाच्या विकासासाठी झटणारा नेता म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शरद पवार प्रचाराच्या या शेवटच्या सभेत नेमकी काय भूमिका घेणार? मतदारांना कोणते आवाहन करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

मंडप उभारले, सभांची जोरदार तयारी 

अजित पवार आणि शरद पवार यांची बारामतीमध्येच सांगता सभा होत आहे. 1967 सालापासून शरद पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामतीतील मिशन बंगला मैदानात होत असे. मात्र लोकसभा निवडणुकीत हे मैदान अजित पवार यांनी मिळवले होते. त्यामुळे शरद पवार यांची सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ घेतलेली सांगता सभा लेंडीपट्टी मैदान येथे झाली होती. यावेळीही अजित पवार यांची सांगता सभा ही मिशन बंगला मैदानावर तर शरद पवार यांची सभा लेंडीपट्टा मैदानावर होणार आहे. त्यासाठी दोनी गटांकडून मंडप उभारण्यात आले आहेत. ही सभा जास्तीत जास्त मोठी आणि भव्य कशी होईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, सभांचे मंडप उभे राहिले आहेत. सभा मात्र कोण जिंकणार? शेवटच्या टप्प्यात शरद पवार मास्टरस्ट्रोट मारणार की अजित पवार विकासाचं कार्ड वापरून मतदारांना जिंकणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.   

हेही वाचा :

Uddhav Thackeray: मनसे नाही गुनसे, ठाण्याला गद्दारीचा कलंक; शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा