मुंबई : महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे, आम्ही जनमताचा आदर करणार, मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde On Mumbai Mayor) यांनी व्यक्त केलं. विरोधकांकडून अफवा पसरवण्यात येत असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये असंही ते म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते असंही शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

मुंबईत महापौरपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा संभ्रम असल्याचं चित्र आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षानिमित्त मुंबईत शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. त्यावर एकनाथ त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Eknath Shinde : जनमताचा अनादर करणार नाही

एकनाथ शिंदे म्हणाले की, "2019 साली जनमताचा अनादर करत ठाकरेंनी वेगळी सत्ता स्थापन केली, तसं आम्ही करणार नाही. आम्ही जनमताचा आदर करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद, नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढल्या गेल्या. त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढलो त्या त्या ठिकाणी महायुतीचाच महापौर निवडून येणार."

Continues below advertisement

ठाणे आणि कल्याणमध्ये अडीच वर्षांच्या महापौरपदाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, या विरोधकांनी पसरवलेल्या अफवा आहेत. आमची लढाई ही सत्ता खुर्चीसाठी नाही, आमची लढाई ही मुंबईच्या विकासासाठी आहे. मुंबईकरांना आम्ही काय देणार आहोत यावर आम्ही लक्ष दिलं आहे.

शिंदेंच्या शिवसेनेच्या नवनियुक्त नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्या पक्षाची बैठक घेतली, नव्याने निवडून आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केलं. पुढच्या पाच वर्षात त्यांनी काय काम करायचं याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं.

Shivsena Group Leader BMC : शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेत्याची निवड होणार

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे मुंबतील ताज लँड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे आता ताज हॉटेलमधील पॉलिटिक्सला वेग आल्याचं दिसतंय. शिंदेंच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालिकेतील 'गट' तातडीने स्थापन केला जाणार असल्याची माहिती आहे. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून गट नेत्यांची निवड केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

गटनेत्यांच्या यादीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव यांच्यासह आणि अमेय घोले सारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांच्या नावाची चर्चा आहे. गट स्थापन करण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया केल्यास नगरसेवक फुटीबाबत निश्चिंत राहता येईल. त्या अनुषंगाने शिवसेनेत या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ही बातमी वाचा: