Popatlals Wedding Twist Aims to Boost TRP: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील पात्र पोपटलाल खूप प्रचलित आहे. पोपटलाल कधी लग्न  करणार?  हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.  दरम्यान, शोमध्ये लवकरच पोपटलालच्या लग्नाबाबत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पोपटलाल वधूच्या शोधात जयपूरला जाणार असल्याची माहिती आहे.  दरम्यान, पोपटलालचं लग्न जमणार की नाही?  पोपटलाल लग्न करेल की नाही? हे पाहणं आता मनोरंजक असेल. 

Continues below advertisement

तारक मेहताची संपूर्ण टीम जयपूरला जाणार

खरंतर, तारक मेहताची संपूर्ण टीम मकर संक्रांतीच्या शूटिंगसाठी जयपूरला जाणार आहे. या एपिसोडमध्ये पोपटलालचं लग्न होणं अपेक्षित आहे.  Iwmbuzz.com नुसार, रूपा रत्नाचे कुटुंब, पोपटलाल  आणि टप्पू सेना सक्रांतीनिमित्त जयपूरला जाणार आहे. दरम्यान, पोपटलाल वधूच्या  शोधात जयपूरला जाईल.  यावेळी पोपटलाल लग्न करेल की नाही हे पाहणं मनोरंजक असेल. रूपाला  पोपटलालला नात्याचा प्रस्ताव ठेवणाऱ्या एका व्यक्तीचा फोन येतो. या आनंदात पोपटलाल त्यांच्यासोबत जयपूरला जाण्यासाठी तयार होतो. जयपूरच्या मालिकेत पतंग उडवण्याचा  कार्यक्रमही असेल. या एपिसोडची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. 

पोपटलालवर वधुचा पतंग कापण्याचा आव्हान

दरम्यान, लग्नासाठी पोपटलालला त्याच्या होणाऱ्या वधूचा पतंग कापण्याचा आव्हान दिले जाईल. पोपटलाल हे आव्हान पूर्ण करू शकेल का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, पोपटलाल मुलीकडून प्रस्ताव येण्याची ही पहिलीच वेळ नाही.  त्याने या आधीही  अनेकदा वर बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. मात्र, त्याचे लग्न होता होता राहिले. प्रत्येकवेळी ती मुलगी निघून जाते. यामुळे पोपटलालचे अनेकदा मन दुखावले गेले. खरंतर शोचे टीआरपी रेटिंग आजकाल घसरत चालले आहे.   

Continues below advertisement

दरम्यान, शो टॉप 5मध्ये आणण्यासाठी निर्माते प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नवीन ट्वीस्ट आणि वळण आणत आहे.  नवीन प्रोमोमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता पोपटलाल वर बनणार का? हे लवकरच नव्या एपिसोडमधून स्पष्ट होईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीचं गोव्यात फोटोशूट, पुरूषांनी भरदिवसा काढली छेड; नेमकं काय घडलं?

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली; हॉस्पिटलमधील PHOTO शेअर करत दिली माहिती, नेमकं काय झालं?