Eknath Shinde on Loksabha Election : "सर्व प्रथम ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मनापासून धन्यवाद देतो. मनापासून त्यांचे आभार मानतो. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. ठाणे लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदारसंघातून उमेदवार होता. सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला. ठाण्याचा बालेकिल्ला मजबूत केला. ठाणेकरांनी त्यांना त्याची जागा दाखवली आहे. त्यामुळे नरेश म्हस्के विजयी झाले आहेत" असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर ते बोलत होते. 






देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचेही अभिनंदन करतो


एकनाथ शिंदे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करतो. कारण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. लवकरच एनडीएचे सरकार बनेल. कारण ज्या लोकांनी, इंडिया आघाडीचे लोक मोदी द्वेषाने पछाडले होते. मात्र, देशाच्या जनतेने विकासाला मतदान केले आहे. आम्ही विकासाचे राजकारण करतो. त्यामुळे या देशातील जनतेने पुन्हा एकदा मोदींना पसंती दिली आहे. 


राज्यात विरोधकांनी अपप्रचार केला, संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली


पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात विरोधकांनी अपप्रचार केला. संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली. आम्ही जनतेचा गैरसमज दूर करण्यास कमी पडलो. याचा आम्ही नक्कीच विचार करु. आम्ही पुढील काळात जनतेचा संभ्रम दूर करु. व्होट बँकेचे राजकारण कायम टिकू शकत नाही. हे बाळासाहेब ठाकरेंना देखील आवडलं नसतं. लोक यांना बळी पडलेत त्यांना सुद्धा यांचा खरा  चेहरा लक्षात येईल. आम्ही काम करणारे लोक आहोत. लोकांनी कामाला पसंती दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील लोकांचे आभार व्यक्त करतो, असंही शिंदे यांनी म्हटलं. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Lok Sabha Elections Results 2024 Live : देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर? नवी दिल्लीत हालचालींना वेग; मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर;