Eknath Shinde: बाळासाहेबांचा निष्ठावंत सेवक चंपासिंह थापाची शपथविधीपूर्वी मोठी भूमिका, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी...

Eknath Shinde Maharashtra Goverment: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक राहिलेले चंपासिंह थापा यांनी देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीआधी आपली भावना व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

Eknath Shinde Maharashtra Goverment मुंबई: शपथविधीला साडे तीन तास उरलेत आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde Maharashtra Goverment) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याचा संभ्रम कायम आहे. अशातच शिवसेनेच्या आमदारांनी  वर्षा बंगला गाठला आहे. एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी असा शिवसेनेच्या आमदारांचा आग्रह आहे. एकनाथ शिंदे तासाभरात निर्णय घेतील असं उदय सामंतांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक राहिलेले चंपासिंह थापा (Champasingh Thapa) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीआधी आपली भावना व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांत महाराष्ट्रात अनेक कामं केली. एकनाथ शिंदे यांनी शपथ घ्यायला हवी. यापुढेही एकनाथ शिंदेंनी प्रशासनात राहून कामं करायला हवी. तीन पार्टी मिळून आणखी पाच वर्ष चांगलं काम करतील. मी देखील त्यांच्यासोबत आहे, असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चंपासिह थापा यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. त्यावेळी चंपासिंह थापा यांनी आपण एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं सांगितलं. बाळासाहेबांची सावली असणारे चंपासिंह थापा यांना आपल्याकडे खेचून एकनाथ शिंदेंनी जनमत आपल्यासोबत असल्याचं दाखवलं. 

कोण आहे चंपासिंह थापा?

चंपासिंह थापा यांची शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू सहाय्यक अशी ओळख आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर थापा हे बाळासाहेबांची सावली झाले असे म्हटले जाते. नेपाळहून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्ताकारणात एक महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा मदतनीस होण्याचा प्रवासही वेगळा आहे. चंपासिंह थापा हे जवळपास चार-पाच दशकांपूर्वी नेपाळमधून भारतात पोटाची खळगी भरण्यासाठी आले होते. गोरेगावमध्ये लहान-सहान कामे करत असताना भांडूपमधील नगरसेवक के.टी. थापा यांच्यासह चंपासिह थापा मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर बाळासाहेबाना शांत चेहरा आणि भेदक नजर असलेला तरूण मातोश्रीवर थांबवून घेतला. 1980-85 पासून थापा हे बाळासाहेब ठाकरे यांचा खास विश्वासू मदतनीस झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांचा दिनक्रम सांभाळणे, त्यांची सेवा करणे याला थापा यांनी वाहून घेतले. 

Maharashtra CM: महायुती सरकारच्या शपथविधीपूर्वी मोठ्ठा ट्विस्ट, उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही तर...

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola