पुणे: राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज दुपारच्या सुमारास ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या ज्युपिटर रुग्णालयात काही चाचण्या, तपासण्या करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचं ज्युपिटर रूग्णालयात चेकअप केल्यानंतर आमि काही तपासण्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते वर्षा बंगल्याकडे रवाना झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना ताप, सर्दी आणि घशाचा संसर्ग झाला होता. तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून शिंदे (Eknath Shinde) आजारी आहेत. आजारपणामुळे त्यांनी साताऱ्यातील दरेगावात दोन दिवस मुक्काम केला. त्यानंतर ते ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आराम करत आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल (सोमवारी) रात्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांना सलाईन लावली होती, अशी माहिती गिरीश महाजनांनी नंतर माध्यमांना दिली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ॲक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. 


गेल्या काही दिवसांपासून त्यांनी पक्षातील आमदारांच्या भेटी टाळल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वर्षा बंगल्यावर पोहोचल्यानंतर पक्षातील इतर नेते आणि आमदार वर्षावर दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात परवा(गुरूवारी) शपथविधी पार पडणार आहे, मात्र अद्याप जागावाटपाच्या बाबतीत पेच आहे, तो सोडवण्याचा देखील प्रयत्न केला जाऊ शकतो. त्याचबरोबर शिंदे आपल्या आमदारांची बैठक घेऊन आगामी निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 


तपासणीनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया 


ज्युपिटर रूग्णालयात तपासण्या झाल्यानतंर डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्युपिटर रुग्णालयातून बाहेर पडले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मोजक्या शब्दांमध्ये एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "माझी तब्येत चांगली आहे. चेकअपसाठी आलो होतो. माझी प्रकृती उत्तम आहे", असं शिंदेंनी सांगितलं. यानंतर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शिंदेंच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रकृती आता बरी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.


काय म्हणाले डॉक्टर?


ज्युपिटर रुग्णालय येथे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. इन्फेक्शनची तपासणी आणि MRI चा रिपोर्ट चांगला आल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे आता कामही करू शकतात असेही यावेळी डॉक्टर म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा एक्स-रे आणि सिटीस्कॅन करण्यात आला. डॉक्टरांकडून शिंदे (Eknath Shinde) यांच्या  तपासण्या करण्यात आल्या. घशातील संसर्ग आणि कफ असल्याने एकनाथ शिंदे यांचे सिटी स्कॅन करण्यात आले आहे. 



एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी पक्षातील नेते, आमदार वर्षा बंगल्यावर यायला सुरुवात झाली आहे. सध्या आमदार दिपक केसरकर, उदय सामंत, संजय शिरसाट, राहुल शेवाळे वर्षा निवासस्थानी असल्याची माहिती आहे. तर गुलाबराव पाटील वर्षावर दाखल झाले आहेत.