मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024 Result) महायुतीने (Mahayuti) जोरदार मुसंडी मारून महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) चारी मुंड्या चित केलं. महायुतीतील तिन्ही पक्षांनी एखत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 50 जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. महायुतीला मिळालेला हा अनपेक्षित अंदाज पाहून महाविकास आघाडीतील नेत्यांनी हे सर्वाकाही अपेक्षित आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लोकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार


सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे. भाजपा बावनकुळे यांच्याच नेतृत्वात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे म्हटले जात आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत काम


गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात महापालिकेसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत चालवला जात आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर निवडणूक घेऊन लोकप्रतिनीधींच्या मार्फत विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर आगामी काळात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा? 


भाजपा- 132


शिवसेना (शिंदे गट)- 57


राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41


काँग्रेस- 16


राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10


शिवसेना (ठाकरे गट)- 20


समाजवादी पार्टी- 2


सत्तास्थापनेसाठी हालचाली, नेमका फॉर्म्यूला काय?


दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी हालचाली चालू झाल्या आहेत. आम्ही मोठा पक्ष असल्यामुळे मुख्यमंत्रिपद आमच्याकडेच राहावे, असा भाजपाचा आग्रह आहे. तर पहिले अडीच वर्ष आम्हाला मुख्यमंत्रिपद द्यावे, अशी भूमिका शिंदे यांच्या शिवसेनेने घेतली आहे.


हेही वाचा :


Maharashtra Election Result: मुख्यमंत्री शिंदेंना आमदार फुटण्याची भिती? विधानसभेतील घवघवीत यशानंतही पक्षानं घेतला 'हा' मोठा निर्णय


Maharashtra Assembly Elections Results 2024 : महाराष्ट्राच्या मुलुख मैदानी महायुतीचा अतिप्रचंड विजय, भाजपला शिंदे,दादांची साथ; मविआचं आव्हान दुहेरी अंकांवरच शमलं!


Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे 288 आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा