मुंबई : कालिदास कोलंबकर यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करावा अशी टीका मुंबई दक्षिण-मध्यचे काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.


मुंबईतील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेत दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांना कोळंबकरांनी पाठिंबा जाहीर केला होता. यावरुनच गायकवाडांनी कोळंबकरांवर टीका केली आहे.

राजकारणात प्रत्येकाने नैतिकता पाळली पाहिजे, तसेच नेते गेले म्हणजे जनता जाते असं होत नाही, जनता आमच्याबरोबर आहे असे मतं कोळंबकरांनी व्यक्त केलं आहे. मुंबईतील सायन प्रतीक्षानगरमध्ये भव्य बाईक रॅली काढली त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान या रॅलीत मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

VIDEO | कालिदास कोळंबकरांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा नंतर शिवसेनेचा प्रचार करावा : एकनाथ गायकवाड | मुंबई | एबीपी माझा



कोळंबकर मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईतील पूर्वीच्या नायगाव आणि आताच्या वडाळा मतदारसंघातून सहा वेळा कोळंबकर विधानसभेवर निवडून आले आहेत.

यापूर्वीच कालिदास कोळंबकर यांच्या कार्यालयांच्या बॅनरवर काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो दिसले होते. दादरमधील काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयासमोरच कालिदास कोळंबकर यांनी बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून आपला इरादा जाहीर केला होता.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रात पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपचा रस्ता धरला आहे. त्यामध्ये कोळंबकरांच्या रुपाने आणखी एकाची भर पडली आहे.

कालिदास कोळंबकरांना जनता जागा दाखवेल : संजय निरुपम

मुंबई वायव्य मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी नाराज काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर टीका केली आहे.  गेल्या 2 वर्षांपासून भाजपच्या संपर्कात असलेल्या कोळंबकरांना येत्या दोन ते तीन महिन्यात जनता जागा दाखवले असं मतं निरुपम यांनी व्यक्त केल आहे.

तसेच प्रचारादरम्यान उमेदवार संजय निरुपम यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.तर येत्या काही दिवसात मुंबईत राहुल गांधींची सभा होणार असल्याचं निरुपम म्हणाले.

VIDEO | कालिदास कोळंबकरांना जनता जागा दाखवेल : संजय निरुपम | मुंबई | एबीपी माझा



संबंधित बातम्या

काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपमध्ये, राहुल शेवाळेंना पाठिंबा