Rajiv Kumar On Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केली असून त्या दृष्टीने आपापल्या रणनीती आखल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission) सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं मोठं वक्तव्य मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलंय. लोकसभेसोबत काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत असं ते म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्यानंतर आता लवकरच निवडणुकांच्या घोषणा केल्या जातील अशी अटकळ बांधली जात आहे.
काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त? (Chief Election Commission Rajiv Kumar)
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "आम्ही 2024 च्या संसदीय निवडणुका आणि ओडिशा राज्याची विधानसभा निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, त्याची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओडिशामध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत ओडिशाच्या निवडणुकाही जाहीर केल्या जाऊ शकतात. या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 रोजी संपणार आहे.
किती टप्प्यात मतदान होणार?
2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 9 टप्प्यात मतदान झाले होते. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 7 टप्प्यात मतदान झाले होते. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका किती टप्प्यात होतील याची अधिकृत घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाईल.
नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा
लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये मुख्य लढत ही भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडी यांच्यात होणार आहे. भाजप आणि एनडीएचा चेहरा नरेंद्र मोदी हेच असून त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक लढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व कोण करणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका जाहीर सभेत सांगितले होते की, लोकसभा निवडणुकीत भाजपचे लक्ष्य 370 जागा जिंकण्याचे असून एनडीएचे लक्ष्य 400 हून अधिक जागा जिंकण्याचे आहे.
ही बातमी वाचा: