कल्याण : निवडणुकांमध्ये साध्या परवानग्या देतानाही पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भिवंडी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांनी केला आहे. यामुळे साहजिकच विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात अडथळे निर्माण होत असल्याचा टावरे यांचा दावा आहे.


चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाला आता अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यात अशा अडथळ्यांमुळे प्रचार मंदावत असल्याचं सुरेश टावरे यांनी म्हटलं आहे. बदलापुरात प्रचारासाठी आलेले असताना त्यांनी हा आरोप केला, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.

स्थानिक पातळीवर सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सभा, रॅली, रोड शो यासाठी तातडीनं परवानग्या दिल्या जातात. मात्र विरोधी पक्षाच्या उमेदवारांना या परवानग्या देताना जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा टावरेंचा आरोप आहे. याचा सरळ परिणाम प्रचार आणि पर्यायाने मतदानावर होणार असून हा पक्षपातीपणा योग्य नसल्याचं सुरेश टावरे यांचं म्हणणं आहे.

भिवंडीत काँग्रेसच्या सुरेश टावरे यांचा सामना विद्यमान भाजप खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात होणार आहे.

VIDEO | ...तर रेल्वे बंद ठेवली असती काय? : हिंतेंद्र ठाकुर | पालघर