मुंडे साहेबांचा वारस मी कधीच समजलं नाही. ते पंकजाताईनेच सांभाळावे. त्याचा त्यांनाच लखलाभ. विरोधी पक्षनेता तोडपाणी करणारा असता तर सरकारचे घोटाळे बाहेर काढले नसते असा टोला धनंजय मुंडेंनी लगावाला. तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये आहात तेव्हा चौकशी समिती नेमावी असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांनी केली केलं.
VIDEO | हिंमत असेल तर लोकसभा लढवा, पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना आव्हान | बीड | एबीपी माझा
वर्धा जिल्ह्याच्या आष्टी येथे काँग्रेस उमेदवार चारुलता टोकास यांच्या प्रचारार्थ सभेच आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंडे यांनी पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी, पंकजा मुंडे यांच्यासह सरकारवर सडकून टीका केली.
धनूदादा अशी हाक आता कानावर पडत नाही, माझाच्या तोंडी परीक्षेत धनंजय मुंडेंची खंत
पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "राजकारणात येण्यापूर्वीचं माझं आणि बहिणीच नातं मला आवडतं. राजकारणात आल्यानंतर आमच्यात जे अंतर पडत गेलं ते व्हायला नको होतं. इतक्या वर्षात आता या नात्यात अंतर पडलं आहे. मला त्यांनी धनुदादा म्हणून हाक मारणं आता कानावर पडत नाही".