कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा अविकसित ठेवण्याचं काम सतेज पाटील यांनी केलं आहे. सतेज पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदम यांच्या वक्तव्याने सिद्ध झालं. मुबलक पाणी देऊ म्हणून स्वतः आंघोळ करून घेतली, पण जनतेला पाणी मिळत नाही अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. 


मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकत नाही


दरम्यान, लाडकी बहिणींना धमकावून अडचणीत सापडलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला खासदार धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिले. महाडिक म्हणाले की, लाडकी बहीण बाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी तातडीने बहिणींची माफी मागितली, पण सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेला ज्या शब्दात बोलले त्यावर त्यांनी माफी मागितली नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत जाऊन सांगत आहेत, की मुन्ना महाडिक यांचा हात तोडा, पाय तोडा असं म्हणतात. उद्धव साहेब मी तुमची माफी मागतो, मला तुमचा अवमान करायचा नाही, पण मी सांगतो मुन्ना महाडिकाचा भांग देखील कोण वाकडा करू शकत नाही, असा कोण पृथ्वीवर जन्माला आलेला नाही. उद्धव साहेब आपल्या भाषणाचा कोणतरी गैरफायदा घेतील म्हणून आज हे मला बोलावं लागतं, असे महाडिक म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या