Continues below advertisement

मुंबई : मराठी माणसाचा विकास केला म्हणजे काय केलं? 25 वर्षांत मराठी माणसाला मुंबईबाहेर जावं लागलं, हा विकास नाही. परप्रांतियांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास नाही असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाकरे बंधूंना लगावला. तसेच आमचं हिंदुत्व हे पूजा पद्धतीवर अवलंबून नाही, तर प्राचीन भारतीय जीवनपद्धती माणणाऱ्यांना आम्ही हिंदू मानतो असंही ते म्हणाले.

ठाकरे बंधूंनी मराठी आणि अमराठी असा भेदभाव करत निवडणूक लढण्याचा खूप प्रयत्न केला. पण मराठी माणूस संकुचित नाही. महाराष्ट्रात क्षेत्रीय अस्मिता आहे, मराठी भाषा अभिमान आहे. कल्याण झालं पाहिजे आणि मराठी माणूस हा महाराष्ट्रात सुरक्षित असला पाहिजे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.

Continues below advertisement

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी बीडीडी वरळीवासियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.बीडीडीवरुन उद्धव ठाकरे आणि महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळीला भेट दिली. महाराष्ट्राची जनात मोदींच्या सोबत आहे. 26 ते 27 महानगरापालिकांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Devendra Fadnavis On BMC : मराठी आणि हिंदू वेगळं नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आम्ही हिंदुत्त्व नाही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली. हिंदुत्व आणि विकास वेगळे होऊ शकत नाही. आमचं हिंदुत्व संकुचित नाही. आमचं हिंदुत्व हे पूजा पद्धतीवर आधारित नाही. भारतीय संस्कृती, प्राचीन भारतीय जीवनपद्धती मानणाऱ्यांना आम्ही हिंदू मानतो, म्ही त्यांना सोबत घेऊ चालू. त्यामुळे मराठी आणि हिंदू हे वेगळे होऊ शकत नाही."

Devendra Fadnavis On Mumbai Election : मुंबईवर महायुतीचाच झेंडा

महापालिका निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका युती जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकही महायुती जिंकणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

ठाकरे बंधूंच्या युतीवर पुन्हा एकदा फडणवीसांनी निशाणा साधला. ठाकरे बंधूंची युती म्हणजे प्रीतीसंगम नव्हे तर भीतीसंगम असल्याच पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रावादी पक्ष त्यांचं आस्तित्व टीकवण्यासाठी एकत्र आल्याचंही फडणवीस म्हणाले.

ही बातमी वाचा: