BMC Election 2026 PADU Machine: निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. ते उद्या सगळीकडे ठेवलं जाणार आहे. ईव्हीएम बंद पडलं, तर हे मशीन वापरलं जाणार आहे. पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती. ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. तर PADU मशीन अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरलं जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

Continues below advertisement

PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही- भूषण गगराणी (BMC Election 2026)

PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. अपवादात्मक (इमरजेंसी) परिस्थितीमध्ये हे PADU मशीन वापरलं जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.

PADU मशीन म्हणजे नेमकं काय?, ते कसं काम करतं? (What exactly is a PADU machine How does it work?)

  1. मुंबई महापालिका निवडणुकीत नव्याने वापरण्यात येणारे आणि राज ठाकरे यांनी आक्षेप घेतलेलं PADU मशीन नेमकी काय आहे?, याची माहिती समोर आलेली आहे.  
  2. PADU मशीन म्हणजेच printing Auxiliary Display Unit
  3. मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीची M3A हे मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत.
  4. या यंत्राद्वारे नोंदविलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला पॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे.
  5. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल, तर भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या PADU युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
  6. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला 140 PADU मशीन प्राप्त झालेल्या आहेत.

राज ठाकरेंचे निवडणूक आयोगाला सवाल- (Raj Thackeray On BMC Election 2026)

1. काल 5 वा. प्रचार संपला,आज प्रचाराला मुभा कशी दिली?

Continues below advertisement

2. आतापर्यंतच्या निवडणुकीतील प्रचाराची प्रथा यावेळी का मोडली?

3. मतदानाच्या आदल्या दिवशीही भेटण्याचे अधिसूचना आज का काढली?

4. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात 'पाडू' नावाचे नवे मशिन का जोडताय?

5. 'पाडू' नावाच्या मशिनबद्दल राजकीय पक्षांना माहिती का दिली नाही?

6. सरकारला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी आयोग आहे का?

संबंधित बातमी:

Raj Thackeray On BMC Election 2026: निवडणूक आयोगाने 'पाडू' मशीन आणलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल, मतदानाच्या एक दिवसाआधी काय घडलं?