Anil Sawant Meets Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणचे उमेदवार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेत आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अनिल सावंत (Anil Sawant) यांनी आज अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अनिल सावंत हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत. त्यांनी विधानसभेला शिवसेना शिंदे गटाची साथ सोडून हाती तुतारी घेतली आहे. 


नेमकं काय म्हणाले अनिल सावंत?


दरम्यान, याबाबत एबीपी माझाने अनिल सावंत यांच्याशी संपर्क साधला. यावेळी सावंत म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना भेटून आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे उद्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते यासंदर्भात निर्णय जाहीर करणार असल्याचे अनिल सावंत म्हणाले. दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगले वातावरण आहे. त्यामुळं या निवडणुकीत विजय आमचाच होणार असल्याचा विश्वास देखील अनिल सावंत यांनी यावेळी बोलून दाखवला. 


अनिल सावंत यांच्या उमेदवारीने आघाडीत बिघाडी


दरम्यान, अनिल सावंत यांच्या उमेदवारीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यांनी उमेदवारी जाहीर केल्यापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आज दिवाळी पाडव्या दिवशी म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली आहे. दरम्यान, महायुतीकडून या मतदारसंघात पुन्हा भाजपच्या समाधान आवताडे यांनी संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्रशांत परिचारक हे देखील इच्छुक होते. सावंत कुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत असले तरी मला शरद पवार यांच्यासोबत राहायचे असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा जिल्हा वेगळा, पक्ष वेगळा आहे आणि त्यांचे विचारही वेगळे आहेत. मात्र, माझे विचार शरद पवार साहेबांसोबत राहण्याचे असल्याचे अनिल सावंत यांनी सांगितले होते. कुटुंब म्हणून आम्ही परिवार एक असलो तरी आमच्यात राजकीय मतभेद असल्याने मी या वेळेला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवारांची तुतारी मागितली होती. त्याप्रमाणे मला किकीट मिळाले असल्याचे सावंत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार