नागपूर : राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडावणार आहे. आज सर्वत्र प्रचार, रॅली आणि सांगता सभा मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सावनेर मतदारसंघाचे भाजप उमेदवार आशिष देशमुख यांच्या प्रचारासाठी खापरखेडा येथे प्रचार सभेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस नेते सुनील केदारांवर (Sunil Keadr) टीकेची झोड उठवत चौफेर फटकेबाजी केली आहे.
इंतजार था एक मौके का, अब हिसाब होगा हर धोके का, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुनील केदारांना लक्ष्य केलं आहे. गेल्या 25 वर्षात केदार यांनी केलेल्या अत्याचाराचा बदला आता घ्यायचा आहे. बँक घोटाळ्या प्रकरणी कोर्टाने सुनील केदार यांना दंडित केले आहे. बँक घोटाळ्याने अनेक वर्ष मागे गेलेल्या शेतकऱ्यांचा बदला आपल्याला या निवडणुकीतून घ्यायचा आहे. केदार यांची अवैध धंदे, दारू, वाळूचे राजकारण या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला संपवायचे आहे. असे आवाहन त्यांनी या सभेतून केलं आहे.
महाराष्ट्राचा फील, राज्यात पुन्हा बहुमताचे महायुतीचे सरकार- देवेंद्र फडणवीस
सावनेर मध्ये एका ही उद्योग केदार यांनी आणले नाही. क्षमता असून ही या भागाचा विकास होऊ शकला नाही. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला आहे. दरम्यान, मी पूर्ण महाराष्ट्रात जाऊन आलो आहे. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, महाराष्ट्राचा फील मला आला आहे. महाराष्ट्राने जो निर्णय घेतला आहे. त्यानुसार 23 तारखेला महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने येत आहे. तसेच सावनेर मध्ये परिवर्तनाची अशी वेळ येणार नाही. तुम्ही आता चुकले तर अशी वेळ पुन्हा येणार नाही. नागपुर जिल्ह्यातील सर्वात मागास भाग सावनेरचा आहे. सुनील केदार यांनी तुम्हाला दाबून ठेवण्यासाठी विकास केला नाही. केदार यांनी विकासाचे राजकारण केले नाही, दादागिरी चे राजकारण केले. त्यांनी या भागात रोजगार दिले. मात्र, ते दारूचे, सट्टाचे, अवैध वाळूचे रोजगार देऊन चांगल्या घरच्या तरुणांना खराब केले. माझ्या पोलिसांना सर्वाधिक त्रास असेल तर तो सावनेर मध्ये अवैध धंद्यांमुळे आहे.
यही सही समय है, सही निर्णय लेने का- देवेंद्र फडणवीस
ज्या जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँक असते, ते जिल्हे विकासात पुढे जाते. नागपुरातील बँक बुडाली. कोणी घोटाळा केला, कोणी शेतकऱ्यांचे नुकसान केले. एवढ्या वर्षानंतर का होईना सुनील केदार यांना कोर्टाने दोषी ठरविले. त्यांना 5 वर्षाची शिक्षा झाली. सहा वर्षांसाठी ते अपात्र झाले. आता सुनील केदार यांनी पत्नीला उभे केले आहे. घरच्या स्त्रियांवर मी बोलणार नाही. त्या चांगल्या आहे, त्यांच्यावर मी आरोप करणार नाही. मात्र, जर केदार वहिनी जिंकून आल्या, तर आमदार म्हणून त्या काम करतील का? आता रामटेकचे श्याम बर्वे खासदार झाले आहे, मात्र ते कुठे दिसतात का, सर्व काम सुनील केदार यांनी आपल्या हातात घेतलंय. त्यामुळे भावनेत वाहून जाऊ नका, योग्य निर्णय करा. यही सही समय है, सही निर्णय लेने का, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा