Kasba Peth Assembly Election: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघाचा एक विभाग आहे. हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, कारण ते 1995 ते 2019 पर्यंत भाजपचे आमदार जिंकत आले आहेत.मात्र, 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने काँग्रेसनेते रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं होतं. कसबा पेठ ही पाचव्या शतकात स्थापन झालेली पहिली पेठ होती आणि पुण्यातील सर्वात जुनी पेठ आहे. याला पुणे शहराचे हृदय असंही म्हटलं जातं. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता शैलेश टिळक यांनी कसबा पेठ मतदारसंघातून 75,492 मतांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक पार पडली त्यामध्ये काँग्रेसने विजय मिळवला, त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा मोठी तयारी केली होती. त्यानुसार पुन्हा भाजपने आपला गड परत मिळवला आहे.


कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांपैकी एक आहे. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, कारण ते 1995 ते 2019 पर्यंत भाजपचे आमदार जिंकत आले आहेत. मात्र, 2023 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने काँग्रेसनेते रवींद्र धंगेकर यांना निवडून दिलं होतं. कसबा पेठ ही पाचव्या शतकात स्थापन झालेली पहिली पेठ होती आणि पुण्यातील सर्वात जुनी पेठ आहे. याला पुणे शहराचे हृदय असंही म्हटलं जातं. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मुक्ता टिळक यांनी कसबा पेठ मतदारसंघातून 75,492 मतांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक पार पडली त्यामध्ये काँग्रेसने विजय मिळवला, त्यानंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा मोठी तयारी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपने आपला गड परत मिळवला आहे.


कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी मोठा विजय मिळवला आहे. तर विरोधी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना मोठा धक्का बसला आहे. हेमंत रासने यांना 90046 इतकी मते मिळाली आहेत. रविंद्र धंगेकरांना 70623 इतकी मते मिळाली आहेत. मनसे गणेश भोकरेंना 4894 इतकी मते मिळाली आहेत.


महाराष्ट्रातील बहुतांश एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचे भाकीत केले आहे. त्यात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे.


पोटनिवडणुकीनंतरची मतदारसंघातील परिस्थिती


कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे विद्यमान आमदार आहेत. रविंद्र धंगेकरांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांचं नशीब आजमावलं होतं, पण ते लोकसभा हरले. लोकसभेत भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला. त्यानंतर पुन्हा एकदा धंगेकरांनी विधानसभेची तयारी सुरू केली. 


कसबा विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतच मुख्य लढत होणार असल्याने प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजप यांचे प्रतिष्ठा पुन्हा एकदा पणाला लागली होती. 25 वर्षांनंतर कसबा विधानसभा मतदारसंघ हातातून गेला तो काँग्रेसकडे, तो पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने मोठी तयारी केली होती. पोडनिवडणुकीला देखील आणि आताही भाजपकडून पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने हे उमेदवार होते. या वेळी पुन्हा रासने यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. तर, काँग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना मोठा पराभव झाला आहे.


उमेदवारी कोणाला?


महाविकास आघाडी - काँग्रेस - रविंद्र धंगेकर
महायुती- भाजप- हेमंत रासने 
मनसे - गणेश भोकरे
अपक्ष - कमल व्यवहारे


पोटनिवडणुकीचा निकाल 


कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. चुरशीच्या आणि प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी ठरले होते. 


2019 चा निकाल?


2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप नेत्या मुक्ता शैलेश टिळक यांना 75,406 इतकी मते होती, तर काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांना 47,240 इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये मुक्ता टिळक विजयी ठरल्या, मात्र, त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला बालेकिल्ला मिळवला होता. या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.