पुणे : अजित पवाराच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात महायुतीला 35 जागा मिळतील, असा अंदाज मानकर यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चारशे पार जाणार असल्याचं म्हटलं होतं, ते एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसत आहे, असं दीपक मानकर यांनी म्हटलं. बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळेल, असं देखील मानकर यांनी म्हटलं. ते एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलत होते.
दीपक मानकर काय म्हणाले?
नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा चारशे पार जाणार असं म्हटलं होतं, ते संपूर्ण देशात दिसत आहे. एक्झिट पोल 350 च्या पुढं दाखवत आहेत, सर्व चॅनेल दाखवत आहेत, असं दीपक मानकर यांनी म्हटलं. मोदींचं जे या देशासाठी काम आहे आणि लोकांनी जे मतदान केलं आहे ते समोर आलं आहे, असं मानकर म्हणाले. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात महायुतीला 35 जागा मिळतील, असं मानकर म्हणाले. बारामती आणि पुण्याची जागा आम्ही शंभर टक्के जिंकणार आहे, असा विश्वास असल्याचं दीपक मानकर यांनी म्हटलं. बारामती आणि पुण्यातील कार्यकर्त्यांनी काम केलं आहे चांगल्या प्रकारे केलं आहे. नरेंद्र मोदींचा प्रभाव देखील राहिला आहे, असं मानकर म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान जी प्रत्येकाची इच्छा होती ती या ठिकाणी पूर्ण होईल, असा विश्वास असल्याचं मानकर म्हणाले. देशाचा भविष्य चांगलं असावं यासाठी मोदींची गरज आहे, असं दीपक मानकर यांनी म्हटलं. संपूर्ण जगात जेव्हा मोदी जातात तेव्हा भारत देशाबद्दल बोललं जातं त्यावेळी रुबाब वाढल्याचं दिसतं, असं मानकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. या चार जागांवर आम्हाला विजय मिळेल, असं दीपक मानकर म्हणाले. निकाल येईपर्यंत चर्चा सुरु राहतील, असं मानकर म्हणाले. अजित पवारांचा महाराष्ट्रात जो प्रभाव आहे, त्यांनी जे काम केलं आहे आणि नरेंद्र मोदी यांचं काम आहे, त्याच्या बदल्यात लोकांनी जे मतदान केलंय ते समोर येईल आणि आमच्या जागा निवडून येतील. राष्ट्रवादीचं संघटन आहेच पण त्यासोबत महायुतीपण आहे, असंही दीपक मानकर म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात बारामती, धाराशिव, शिरुर आणि रायगड या चार जागा लढवल्या होत्या. या ठिकाणी बारामतीत सुनेत्रा पवार, शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव, रायगडला सुनील तटकरे आणि धाराशिवला अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवली होती.
संबंधित बातम्या :
अजित पवारांचे 3 गडी जिंकले, 4 उमेदवार थोडक्या मतांनी पडले, मोठी संधी हुकली