Sanjay Raut on Eknath Shinde : मुंबई तोडता येणार नाही म्हणून शिवसेना फोडल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. अमित शाहांनी मुंबई लुटली आहे. अमित शाह यांच्या कंपनीला एकनाथ शिंदेनी पक्ष आणि चिन्ह दिलं आहे. शिवसेना हे चिन्ह आपल्याला परत द्यावे लागणार आहे. ज्यादिवशी हे चिन्ह एकनाथ शिंदीकडून जाईल तेव्हा भाजप एकनाथ शिंदे यांना लाथा घालून बाहेर काढेल अशी टीका देखील संजय राऊतांनी केली. लोकशाही भाजपच्या बापाची आहे का? असा सवाल करत राऊतांनी भाजपवर टीका केली.

Continues below advertisement

लोकशाही भाजपच्या बापाची आहे का

लोकशाही भाजपच्या बापाची आहे का? महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? असे सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते पुण्यात बोलत होते. भाजपला नगरपालिका, ग्रामपंचायत सगळी सत्ता हवी आहे. सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेतात आणि सत्तेत बसवतात. सत्तेत बसवलेले अजित पवार हे ज्वलंत उदाहरण आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.

फेकाफेकीसाठी मोदी आणि फडणवीस यांना नोबेल दिला पाहिजे

अजित पवार यांच्यावर भाजपने 70 हजार कोटींचा आरोप केला आणि नंतर तेच उपमुख्यमंत्री झाले. व्हाइट पेपर काढलं देशातलं तर सगळ्यात मोठा घोटाळा अशोक चव्हाणांनी केला ते आज भाजपमध्ये गेलेत असे राऊत म्हणाले. भाजपचा फेकनामा प्रसिद्ध केला आहे. याला साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला पाहिजे असा टोला राऊतांनी लगावला. फेकाफेकीसाठी मोदी आणि फडणवीस यांना नोबेल दिला पाहिजे असेही ते म्हणाले. आता काँग्रेसयुक्त भाजपा झाली आहे. काँग्रेसयुक्त भारत करायला निघाला होतात आता त्यांनाच आपल्यात घेतल्याचे राऊत म्हणाले. 

Continues below advertisement

मुंबई मराठ्यांची शान आहे

पहालगाममध्ये हिंदूंना मारले आहे. हिंदू म्हणून मारल्याचे संजय राऊत म्हणाले. ट्रम्पचा कॉल आला आणि युद्ध थांबवलं एवढा डरपोक पीएम पहिला नाही अशी टीका देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. इंदिरा गांधींचं नाव काढलं की राग येतो त्यांना असेही राऊत म्हणाले. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि मराठी माणसाची आहे. 106 लोकांनी बलिदान दिलं आहे. ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. तोडायची नाही तर केंद्रशासीत प्रदेश करायचा असल्याचे राऊत म्हणाले. अण्णा मालाई मुंबई महाराष्ट्राची नाही अस म्हणतो. तेव्हा अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे नामर्द सारखे उभे होते. बूटचाटे मिंधे बघत होते असी टीका राऊत यांनी केला. मुंबई मराठ्यांची शान आहे असेही राऊत म्हणाले.