मुंबई : विधानसभेसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 19 उमेदवारांची नावं आहेत.  या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर नंदुरबार आणि सिल्लोडमध्ये काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे. यासोबतच कणकवली मतदारसंघातून सुशील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची पहिली यादी 29 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे यांच्यासह 51 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 52 उमेदवारांचा समावेश केला आहे. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवावी असा पक्षाचा आग्रह होता. मात्र चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत केल्याने त्यांना कराड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदार संघातून हे दोघे बंधू धीरज देशमुख आता मैदानात असतील.

Sanjay Nirupam on Congress | पक्ष सोडण्याची वेळ दूर नाही : संजय निरुपम | ABP Majha



काल मध्यरात्री काँग्रेसकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये 20 उमेदवारांची नावं आहेत. अक्कलकोटचे सिद्धाराम म्हेत्रे आणि मालाडचे अस्लम शेख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत्या. मात्र त्यांनाही या यादीत उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या चौथ्या यादीतील उमेदवार

  1. उदयसिंग पाडवी - नंदुरबार

  2. डी.एस. अहिरे - साक्री

  3. साजिद खान - अकोला पश्चिम

  4. सुलभा खोडके - अमरावती

  5. बलवंत वानखेडे - दर्यापूर

  6. आशिष देशमुख - नागपूर दक्षिण-पश्चिम

  7. सुरेश भोयर - कामठी

  8. उयदसिंग यादव -रामटेक

  9. अमर वरदे - गोंदिया

  10. महेश मेंढे - चंद्रपूर

  11. माधवराव पवार - हडगाव

  12. खैसार आझाद - सिल्लोड

  13. विक्रांत चव्हाण - ओवाला माजीवाडा

  14. हिरालाल भोईर – कोपरी पाचपखाडी

  15. बलदेव खोसा - वर्सोवा

  16. आनंद शुक्ला - घाटकोपर पश्चिम

  17. लहू कानडे - श्रीरामपूर

  18. सुशील राणे - कणकवली

  19. राजू आवळे – हातकणंगले