Punjab Elections 2022 : पंजाब विधानसभा निवडणूकाचे बिगुल वाजले आहे. सत्ताधारी काँग्रेस पार्टीने 86 उम्मीदवारांची यादी जाहीर केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी हे चमकौर साहिब येथून तर नवजोत सिंह सिद्धू अमृतसर पूर्व मधून निवडणूक लढवणार आहेत.  सोनू सूदची बहिण मालविका सूद मोगा येथून निवडणूक लढवणार आहे. तर कादियानमधून प्रताप सिंह बाजवा आणि मानसा या मतदारसंघातून गायक सिद्धू मूसेवाला निवडणूक लढवणार आहेत. सुजानपूर मतदारसंघातून नरेश पुरी, पठानकोटमधून अमित विज, गुरदासपूर येथे बरिंदरजीत सिंह पहरा यांना काँग्रेस पक्षाने तिकिट दिले आहे.  


पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये  विधानसभाच्या 117 जागा आहेत. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ  27 मार्च 2022 रोजी संपणार आहे.  14 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल.






आधीचं बलाबल काय? 
पंजाब          - 117
भाजप          - 3
काँग्रेस          - 77
आप             - 20
अकाली दल       - 15
इतर             - 2


यावेळी हे मुद्दे गाजणार 
शेतकरी आंदोलनातील पंजाब
पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद
कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अंमली पदार्थांचं सावट
पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न


संबधित बातम्या :
Punjab Election 2022: पंजाबचा मुख्यमंत्री कोण हे जनताच ठरवेल : नवज्योत सिंह सिद्धू
UP Election 2022 : भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून लढणार
Punjab Election 2022 Date : पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात होणार मतदान, 10 मार्चला निकाल 
ABP Opinion Poll : कोण होणार 'पंजाबचा किंग'? आपची मुसंडी तर भाजप चौथ्या स्थानी


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live