Maharashtra Politics नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेस विधानसभा निवडणुकीमध्ये (Vidhan Sabha Election 2024) पुन्हा एकदा संविधान बदलाचा मुद्दाच घेऊन मतदारांमध्ये जाणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण 6 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी नागपुरात संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करून काँग्रेसचे (Congress) प्रचाराची सुरुवात करणार आहे. अजूनही मोठ्या संख्येने मतदारांना वाटतं की संविधानावरील धोका संपलेला नाही. भाजप सत्तेत येऊन संविधान बदलेल अशी शंका अजूनही मतदारांच्या मनात आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही संविधान बदलाचा मुद्दा काँग्रेसचा प्रमुख मुद्दा असेल असे संकेत काँग्रेसचे नेते आणि पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य नितीन राऊत  (Nitin Raut)  यांनी दिले आहे. 

Continues below advertisement

काँग्रेसच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही 

जरी मनोज जरांगे मराठा, मुस्लिम आणि दलित मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नसल्याचा विश्वासही राऊत यांनी बोलून दाखवला. जरांगे स्पष्ट सांगत आहेत की आम्ही (मराठे) पण बहुजन आहोत. त्यामुळे ते कोणाच्या विरोधात राजकीय समीकरण जुळवत आहेत हे सर्वांना माहीत असल्याचे नितीन राऊत म्हणाले. 

भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बौद्ध समाजातून व्हावा- नितीन राऊत

भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बौद्ध समाजातून व्हावा, अशी इच्छाही नितीन राऊत यांनी व्यक्त केली. अनुसूचित जातीतून आजवर मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री झाले आहे. महाराष्ट्रात दलितांना नेतृत्व मिळाले आहे, मात्र बौद्ध समाजाला नेतृत्व मिळालेलं नाही आणि त्या संदर्भात लोकांमध्ये कुजबूज ही सुरू असल्याचे नितीन राऊत म्हणाले. निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्री पदासंदर्भात पक्ष नेतृत्व निर्णय घेईल आणि त्यासाठी तुम्हाला वाट पहावी लागेल असेही नितीन राऊत म्हणाले.

Continues below advertisement

सोशल इंजिनिअरिंग मध्ये प्रदेश नेतृत्व फेल-अनिस अहमद

 आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने उमेदवार निवडताना काँग्रेस महाराष्ट्रात सोशल इंजिनिअरिंग मध्ये फेल झालं आहे. अनेक जातींना उमेदवारी देण्यात आलेली नाही. परिणामी, महाराष्ट्रात विपरीत निकाल पाहायला मिळतील. असा दावा काँग्रेस बडे नेते, माजी मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (All India Congress Committee) चे राष्ट्रीय सचिव राहिलेले आणि अलिकडे वंचितमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या अनिस अहमद यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने काँग्रेसच्या संभाव्य परफॉर्मन्स बद्दल त्यांनी हे सूचक विधान केलं आहे. 

आगामी विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना तिकीट वाटप मध्ये काँग्रेसची चूक झाली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजासह दलित, तेली, बंजारा सर्व समाजाने मिळून 31 खासदार दिले. मात्र, यंदा तिकीट वाटपात जी चूक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विपरीत निकाल पाहायला मिळतील. विशेष जातींना यंदा न्याय देण्यात आलेलं नाही. सोशल इंजिनिअरिंग मध्ये प्रदेश नेतृत्व फेल झालाय. अभ्यास करून उमेदवार द्यायला पाहिजे होते, मात्र आता निकाल धक्कादायक येऊ शकतात. निकाल आल्यानंतर समीकरण पाहून मी निर्णय करणार. असेही अनिस अहमद म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या