मुंबई : लोकसभा निवडणुकीची तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांची यादी जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. यात सर्वात आधी नंबर लावला आहे तो काँग्रेसने. लोकसभेसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दिल्लीतून आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या जागांवरुन विशेष वाद नाही, तिथल्या उमेदवारांची नावं जाहीर केली जाणार आहेत. पहिल्या यादीतील 12 उमेदवारांची नावं आज घोषित होतील असं कळतं. सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे तर नांदेडमधून अमिता चव्हाण यांची नावं जवळपास निश्चित मानली जात आहेत.

काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची यादी!

नंदुरबार -  के सी पाडवी

धुळे - रोहिदास पाटील

रामटेक - मुकुल वासनिक

हिंगोली - राजीव सातव

नांदेड - अमिता चव्हाण

सोलापूर - सुशीलकुमार शिंदे

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान

गडचिरोली - डॉ. नामदेव उसेंडी

वर्धा - चारुलता टोकस

यवतमाळ - माणिकराव ठाकरे

मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा

मुंबई उत्तर मध्य - प्रिया दत्त

मुंबई दक्षिण-मध्य - एकनाथ गायकवाड किंवा वर्षा गायकवाड

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी

यूपी आणि गुजरातमधील 15 उमेदवारांची यादी जाहीर
याआधी काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील 15 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाचाही समावेश आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी तर सोनिया गांधी रायबरेली या पारंपरिक मतदारसंघामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या 15 उमेदवारांपैकी 11 जागा उत्तर प्रदेश तर 4 जागा गुजरातमधील आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच आजपासून देशात आचारसंहिता लागू झाली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.

राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. संपूर्ण देशाचं लक्ष निवडणुकांच्या तारखांकडे लागून राहिलं होतं. सोळाव्या लोकसभेची मुदत 3 जून 2019 रोजी संपते. देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत.

संबंधित बातम्या

ईव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे महत्त्वपूर्ण निर्णय

लोकसभा निवडणूक जाहीर, महाराष्ट्रात 'या' दिवसांत मतदान होणार

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी

2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकांची वैशिष्ट्यं

लोकसभा निवडणूक 2014 : देशभरातील पक्षीय बलाबल

VIDEO | देशात 7 टप्प्यात निवडणुका, आचारसंहिता लागू