सव्वा कोटी भारतीयांसाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं हार्दिकने सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या घरच्या मैदानाकडे काँग्रेसने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गुजरातमधून तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. म्हणूनचं हा निर्णय घेण्यात आला. तसेच गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती.
जामनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या जपच्या पूनमबेन माडम खासदार आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रमभाई अहिर यांचा जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता.
दरम्यान, 2015 मध्ये हार्दिक पटेल जेव्हा पाटीदार आंदोलन करत होता. त्यावेळी लोक त्याच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेलने आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. पण कोणत्या पक्षाच्या वतीने उभारणार हे त्यांनी सांगितले नव्हते.
पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारचा विरोध करत गुजरातमधील स्थानिक स्वराज संस्था निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.
VIDEO | लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात मतदान 23मे रोजी निकाल | नवी दिल्ली | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, सात टप्प्यात मतदान 23मे रोजी निकाल
दरम्यान देशाचा पुढचा चौकीदार कोण असणार आहे नरेंद्र मोदी, राहल गांधी की आणखी कोणी, या प्रश्नाचं उत्तर 23 मे रोजी मिळणार आहे, कारण लोकसभेचं बिगुल वाजलं असून 11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय. नवी महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांमध्ये, म्हणजे 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मतदान पार पडेल.
संबंधित बातम्या
लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी
हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर, जामनगरमधून निवडणूक लढवण्याची चिन्हं
हार्दिक पटेल लवकरच बोहल्यावर चढणार
सांगलीत हार्दिक पटेलच्या उपस्थितीत धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार
हार्दिक पटेलला दोन वर्षांची शिक्षा