माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची मदत घेऊन मोठे झालेल्या संजयामामा शिंदे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी घेतल्याचा राग भाजपला जिव्हारी लागला आहे. यातूनच शिंदेंना पराभूत करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.
VIDEO | वसंतदादा घराण्याला चंद्रकांत पाटलांची भाजपमध्ये येण्याची ऑफर
कल्याणराव काळे हे पंढरपूरचे तरुण नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे दोन साखर कारखाने आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात कल्याणराव काळे यांनी तब्बल 65 हजार मतं घेत त्यांना अडचणीत आणलं होतं. आता काळे भाजपमध्ये गेल्यास संजय शिंदेंसमोरच्या अडचणीतही मोठी वाढ होणार आहे.
निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात वर्चस्व असलेली मोठमोठी घराणी आघाडीची साथ सोडत सत्ताधारी भाजपच्या गोटात सामील होत आहेत.
यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे, वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती धरला आहे. तर राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटीलही राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यातच आता माणिकराव गावित, कल्याणराव काळे यांनीही पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.